मुंबई
Trending

Sanjay Raut : उद्धव ठाकरे यांच्यावर केलेल्या टीकेनंतर खासदार संजय राऊत यांच्या निशाणावर राज ठाकरे

Sanjay Raut On Raj Thackeray Comment About Uddhav : “खान हवा की बाण हवा” राज ठाकरे यांनी प्रचार सभेत उद्धव ठाकरे यांच्यावर साधला निशाणा

मुंबई :- राज ठाकरे Raj Thackeray यांनी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दीडशे मालाड येथे जाहीर सभेमध्ये उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार निशाणा साधला होता. त्यावर ठाकरे गटाचे राज्यसभेचे खासदार संजय राऊत यांनी राज ठाकरेला चांगलाच इशारा दिला आहे. राज ठाकरे हे गुजरामधील दोन व्यापाऱ्यांनी दिलेली स्क्रिप्ट वाचत असल्याचा आरोपही त्यांनी केला. उद्धव ठाकरे Uddhav Thackeray आणि शरद पवार Sharad Pawar हे महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी लढत आहेत. त्यांच्यावर राज ठाकरे हे टीका करत असल्याचेही राऊत Sanjay Raut यांनी म्हटले आहे. निवडणूक आयोग निष्पक्षपणे वागत नसल्याचा आरोपही त्यांनी या वेळी केला.

राज ठाकरे हे दुसरे मोराजी देसाई आहेत. आम्हाला मोरारजी देसाईंची आठवण झाली, हे फार दुर्दैव आहे. ते फार मोठे नेते होते. मात्र, उद्धव ठाकरे यांच्या विषयी बोलताना राज ठाकरे यांनी थोडेसे भान ठेवावे. ते शिवसेनेचे पक्षप्रमुख आहेतच मात्र महाराष्ट्रावर डल्ला मारणाऱ्यांच्या विरोधात त्यांची लढाई सुरू आहे, असे म्हणत संजय राऊत यांनी राज त्यांच्यावर टीका केली. विक्रोळीत वारंवार एखादा नेता सभा घेत असला तरी या मतदारसंघात आमचाच पक्ष निवडून येणार असल्याचा दावा त्यांनी केला. विक्रोळीत दोन सभा काय? त्यांनी येथेच घर करून राहावे, मात्र तरी देखील तेथे सुनील राऊत निवडून येतील असा दावा देखील राऊत यांनी केला आहे.

राज ठाकरे यांना उद्धव ठाकरे यांच्या विरोधात बोलण्यास सांगण्यात आले आहे. राज ठाकरे जे बोलत आहेत ती स्क्रिप्ट त्यांना गुजरात मधून आली असल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला आहे. त्यांनीच उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करण्यास सांगितले असल्याचे राऊत यांनी म्हटले आहे.

राज ठाकरे काय म्हणाले?

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसे प्रमुख राज ठाकरे यांची दिंडोशी मालाड येथे जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती. या मतदारसंघातील मनसेचे उमेदवार भास्कर परब यांच्या प्रचारार्थ राज ठाकरे यांनी सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेत राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली. शिवसेना ठाकरे गटाच्या उमेदवारांनी उर्दूमध्ये पत्र काढले आहे, अशा शब्दात राज ठाकरे यांनी निशाणा साधला. मराठवाड्यामध्ये ‘खान हवा की बाण हवा’ अशा घोषणा दिल्या जात होत्या. मात्र आता उद्धव ठाकरे यांच्याकडून बाण निघून गेला आहे तर फक्त खान उरला आहे, असे देखील राज ठाकरे यांनी म्हटले आहे. ठाकरे गटाचा उमेदवार हारून खान यांच्या नावातच ‘हरू’ आहे. त्यामुळे तो कसा जिंकणार? असा सवाल ही त्यांनी उपस्थित केला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0