Nalasopara Police : नालासोपारात पोलिसांची आणि निवडणूक अधिकाऱ्यांचे संयुक्त कारवाई बेहिशोबी 3.4 कोटी रुपये हस्तगत
Nalasopara Police Seized Illegal Money During Nakabandi : नालासोपारात सीएमएस कंपनीच्या एटीएम व्हॅनमधून संशयास्पद रित्या 3.4 कोटी रुपये जप्त करण्यात आले असून, या प्रकरणी पोलिसांनी सखोल चौकशी सुरू केली आहे.
नालासोपारा :- नालासोपारामध्ये गुरुवारी संशयास्पदरीत्या फिरणाऱ्या सीएमएस कंपनीच्या एटीएम व्हॅनमधून 3.4 कोटी रुपयांची बेहिशोबी रोकड जप्त करण्यात आली आहे. गुन्हे प्रकटीकरण शाखा कक्ष-3 च्या पथकाने ही मोठी कारवाई केली. नालासोपारा पश्चिम एसटी स्टँड रोडवर एमएच 43, बी एक्स 5646 क्रमांकाची व्हॅन संशयास्पद स्थितीत फिरताना आढळली होती. पोलिसांनी तिची तपासणी करण्यास सुरुवात केली. Nalasopara Police Seized Illegal Money या तपासणीत व्हॅनमध्ये दोन व्यक्ती सापडले. तसेच एक चालक होता. हे दोन इसम आणि चालक 3.4 कोटी रुपयांची बेहिशोबी रोकड घेऊन जात असल्याचे आढळले. त्यामुळे या तिघांनाही नालासोपारा पोलीस ठाण्यात Nalasopara Police Station ताब्यात घेण्यात आले.सीएमएस ही कंपनी कॅश मॅनेजमेंट आणि एटीएममध्ये पैसे भरण्याचे काम करते. Nalasopar Police Latest News
जावेद इक्वाल मोहम्मद शफी धंदा चालक (रिअल सिक्युरेटी सर्विसेस रा. जामा मजिद जवळ, गोरेगाव पूर्व,) रोशन जगत सिंग धंदा कॅश ऑफिसर (सि.एम.एस. कनेक्टींग कॉमर्स रा. चंदनसार रोड, विरार पूर्व,) दिपक पांडुरंग मोडक (कैश ऑफिसर सि.एम.एस. कनेक्टींग कॉमर्स रा. फुलपाडा, विरार पूर्व,) नजिर शफिक पठान (धंदा- सुरक्षा रक्षक होम सिक्युरेटी सर्विसेस रा. मालवणी पश्चिम, मुंबई ) भगवंता फुलचंद निशाद (सुरक्षा रक्षक रिअल सिक्युरेटी सर्विसेस रा. कामा इस्टेट, गोरेगाव पूर्व, मुंबई.) या पाच जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांची चौकशी चालू आहे.जप्त रकमेची पडताळणी करण्यासाठी आयकर विभाग, पालघर यांचेशी पत्रव्यवहार करण्यात आला आहे. तसेच न्यायदंडाधीकारी वसई न्यायालय व निवडणुक निर्णय अधिकारी 132 नालासोपारा विधानसभा मतदारसंघ, पालघर यांना सदर घटने बाबत अहवाल सादर करण्यात आला आहे. Nalasopar Police Latest News
पोलीस पथक
मधुकर पाण्डेय, पोलीस आयुक्त दत्तात्रय शिंदे, अपर पोलीस आयुक्त अविनाश अंबुरे, पोलीस उप आयुक्त साो (गुन्हे), मदन बल्लाळ सहाय्यक पोलीस आयुक्त (गुन्हे) मि.भा.व.वि. पोलीस आयुक्तालय यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक/ प्रमोद बडाख, सहाय्यक पोलीस निरीक्षक सोपान पाटील, पोलीस उपनिरीक्षक उमेश भागवत, पोलीस हवालदार मनोज चव्हाण, मुकेश तटकरे, सागर बारवकर, अश्विन पाटील, पोलीस अंमलदार राकेश पवार, तुषार दळवी, मनोहर तारडे, आतिष पवार, प्रविण वानखेडे, गणेश यादव, सागर सोनवणे सर्व नेमणुक गुन्हे शाखा कक्ष-3 विरार यांनी पार पाडली आहे. Nalasopar Police Latest News