Ullhasnagar Raid News : लॉज छापेमारीत बांगलादेशच्या 14 तरुणींची सुटका
14 Bangladeshi girls rescued in lodge raid : 2.75 लाख रक्कम हस्तगत; खंडणीविरोधी पोलिसांची कारवाई
उल्हासनगर :- गुन्हे शाखा खंडणी विरोधी पथकाला मिळालेल्या माहितीच्या आधारे बांगलादेश देशातून आणलेल्या मुलींकडून वेश्याव्यवसाय करवून घेतला जात असल्याच्या माहितीवरून पोलीस पथकाने उल्हासनगर येथील हॉटेल सफायर इन लॉज Ullhasnagar Safair Hotel And Lodge आणि हॉटेलवर छापेमारी करत 14 बांगलादेश मधील तरुणींची सुटका 14 Bangladeshi girls rescued करण्यात आली असून 2.75 लाखांची रक्कम हस्तगत करण्यात आली आहे.
खंडणी विरोधी पथकाच्या माहितीनुसार बुधवारी पहाटे सुमारास लॉजमध्ये बनावट ग्राहक पाठवून यशस्वी छापेमारी केली. या छापेमारीत पोलीस पथकाने लॉजमध्ये मॅनेजरसह 2 वेटर आणि 23 ग्राहकांना यांना ताब्यात घेऊन 14 बांगलादेश बळीत महिलांची सुटका करण्यात आली आहे.
कारवाई दरम्यान लॉजमधून 2.75 लाख रुपये रोख व साधने जप्त करण्यात आली. तर छापेमारीत 23 ग्राहकही ताब्यात घेण्यात आले.
लॉजिंग व बोर्डिंगचे मॅनेजर व तेथे काम करणारे 2 कामगार यांच्या विरुद्ध मध्यवर्ती पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खंडणी विरोधी पथक आणि पोलीस अधिक तपास करीत आहेत.
पोलीस पथक
शिवराज पाटील, पोलीस उप आयुक्त गुन्हे, ठाणे शहर, शेखर बागडे, सहाय्यक पोलीस आयुक्त, शोध 1, गुन्हे शाखा, ठाणे शहर यांच्या मार्गदर्शनाखाली खंडणी विरोधी पथकाचे पोलीस निरीक्षक नरेश पवार, पोलीस उप निरीक्षक,राठोड व त्यांच्या पोलीस पथकाने केलेली आहे.