•Wagle Estate Police Celebrated their Diwali with Patients In Hospital वागळे इस्टेट पोलिसांनी साजरी केली दिवाळी, मनोरुग्णालयात रुग्णांसोबत दिवाळीचे फराळ देत, साजरी केली दिवाळी!
ठाणे :- दिवाळीची धामधूम सुरू होताच बहुतेक सर्व सरकारी विभागांमध्ये सुट्यांचा माहोल सुरू झाला आहे. Mumbai Police Diwali कर्मचारी मोठ्या संख्येने सुटीवर जात असले तरी पोलिस आणि डॉक्टरांसह अत्यावश्यक सेवा देणारे अधिकारी-कर्मचारी मात्र ‘ऑन ड्युटी’ दिवाळी साजरी करतात. राज्यात विधानसभेच्या निवडणुका जाहीर झाले आहे. तसेच आचारसंहिता चालू असल्यामुळे कोणत्याही पोलीस कर्मचारी आणि अधिकारी यांना सुट्टी नसल्याने दिवाळी सण आपल्या परिवारासोबत न साजरा करतात समाजाचा प्रतीक म्हणून त्यांनी ठाण्यातील मनोरुग्ण रुग्णालयात रुग्णांसोबत फराळाचं वाटप करत दिवाळी साजरी केली आहे.
वागळे इस्टेट पोलिसांनी ठाण्याच्या प्रादेशिक मनोरुग्णालय येथील मनोरुग्णासोबत वरिष्ठ पोलीस निरीक्षक शिवाजी गवारे, पोलीस निरीक्षक क्राईम प्रवीण माने, पोलीस निरीक्षक ढोले, पोलीस निरीक्षक गायकवाड, पोलीस उपनिरीक्षक जगताप, महेश जाधव, भोसले आणि वागळे इस्टेट पोलीस ठाण्याचे महिला अंमलदार यांनी रुग्णांसोबत तसेच रुग्णालयाच्या कर्मचारी आणि अधिकाऱ्यांसोबत दिवाळी साजरी केली आहे. Mumbai Police Diwali मनोरुग्णालयात डॉक्टर विनिता पाटील आणि कर्मचारी यावेळी उपस्थित राहून मनोरुग्ण आणि कर्मचारी यांना फराळ वाटप साजरी केली दिवाळी. पोलिसांच्या या उपक्रमामुळे समाजातून मोठ्या प्रमाणावर कौतुक केले जात आहे.