मुंबई

Mira Road Crime News : युट्युब व्हिडिओ लाईक, ऑनलाइन हॉटेल मूव्ही रेटिंग टास्क‌ ,”Work From home”नावाखाली फसवणूक

•काशिगांव पोलिसांची कामगिरी फसवणुकीतील रक्कम परत मिळवून देण्यास यश, चार लाख 76 हजार रुपयाची फसवणूक!

मिरा रोड :- सायबर भामट्यांकडून सावधान रहा..! अन्यथा वर्क फ्रॉम होम च्या नावाखाली तुमची ही होऊ शकते फसवणूक! वर्क फ्रॉम च्या नावाखाली चार लाख लाख 76 हजारांची फसवणूक झाल्याची घटन काशीगावं पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली होती. youtube ऑनलाइन लाईक स्टास्क, ऑनलाइन हॉटेल मुव्ही रेटिंग यांना लाईक करण्याचे काम देण्यात आले होते. तसेच सायबर भुरट्यांनी हे टास्क पूर्ण केल्यास तसेच त्यामध्ये पैसे गुंतवल्यास अधिकचा नफा मिळेल असे अमिष दाखविले होते. काशिगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या निलम संकपाळ यांनी चार लाख 76 हजार रुपयांची फसवणूक झाल्याची घटना पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे. पोलिसांनी अज्ञात आरोपींच्या विरोधात काशिमीरा पोलीस ठाण्यात भादवी कलम 420, 34 सह माहिती तंत्रज्ञान अधिनियमन कलम 66 (सी) 66 (डी) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार निलम संकपाळ यांनी काशिगांव पोलीस ठाण्यात ऑनलाइन फसवणुकीबाबत तक्रार दाखल केली होती. तक्रारीच्या अनुषंगाने पोलिसांनी काशिगाव पोलिसांच्या सायबर विभागाने तपास करत केलेल्या व्यवहारा संदर्भात वेगवेगळ्या बँक खात्यावर वळती केल्याचे दिसून आले. पोलीस यांनी त्वरित संबंधित बँकेसोबत पत्रव्यवहार करून सदर रक्कम गोठविण्यात आली होती. पोलिसांनी न्यायालयासोबत पत्रव्यवहार करून काशिगांव पोलिसांच्या सायबर विभागाने फसवणुकीतील चार लाख 76 हजार रुपये निलम संकपाळ यांच्या मूळ खात्यात परत मिळवून देण्यास यश आले आहे.

पोलीस पथक
प्रकाश गायकवाड, पोलीस उप आयुक्त, परिमंडळ-1, मिरारोड, विजयकुमार मराठे, सहाय्यक पोलीस आयुक्त, मिरारोड विभाग यांचे मार्गदर्शनाखाली राहुलकुमार पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, राहुल सोनवणे, पोलीस निरीक्षक, पोलीस हवालदार सचिन पाटील यांनी पार पाडली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0