मुंबई

Virar Crime News : लिफ्ट देण्याच्या बहाण्याने प्रवाशांना लुटणारी टोळी गजाआड

•Virar Gang Robbing Passengers on the pretext of giving lift लिफ्ट देण्याच्या बहाण्याने प्रवाशांना लुबाडणाऱ्या चौघांना विरार पोलिसांनी 24 तासात अटक केली आहे

विरार :- लिफ्ट देण्याच्या बहाण्याने प्रवाशांना लुबाडणाऱ्या चौघांना विरार पोलिसांनी अटक केली आहे.याप्रकरणी विरार पोलीस ठाण्यात तक्रारदार 20 ऑक्टोबर रोजी तक्रार दाखल केली होती. पोलिसांनी आरोपींच्या विरोधात भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 309(6),3(5) प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला होता. आरोपींनी तक्रार याला चाकूचा धाक दाखवून मारहाण करून तक्रारदाराकडून मोबाईल फोन, पाकीट त्यामधील 500 रु आणि ब्लुटुथ चोरले होते.

वरिष्ठांनी दिलेल्या सुचनाप्रमाणे जबरी चोरी सारख्या गुन्हयाचे गांभिर्य लक्षात घेऊन गुन्हे प्रकटीकरण पथकाने गुन्हयाचा तपास सुरु करुन पडताळणी केलेल्या सि.सि.टि.व्ही फुटेज मध्ये तक्रारदार यांना लुटणाऱ्या इटिंगा कारच्या मागील बाजुस एक लोगो दिसुन आला. लोगोचा सि.सि.टि.व्ही. कैमेरामार्फत मागोवा घेत असतांना, लोगो मानवी हक्क परीषद असा असल्याचे धानीवबाग नालासोपारा-पुर्व येथे निष्पन्न झाला. धानिवबाग येथे गुप्त बातमीदारामार्फत कार व त्यावरील लोगो बाबत माहीती घेतली असता, कार गुफरान खान (रा. धानीव बाग, नालासोपारा पूर्व) यांच्या मालकीची असल्याचे समोर आली. त्याअनुषंगाने गुफरान खान यांना विचारपुस केली असता, कार मालक यांनी कार अशरफ मोहमद इशाहक रंगरेझा (रा. अमनदीप अपार्टमेंट, दुबे स्कुल जवळ, बिलालपाडा, नालासोपारा पूर्व) यास चालविण्यास दिल्याचे समोर आले. त्याअनुषंगाने अशरफ इशाहक यास बोरीवली येथुन ताब्यात घेतले असता, त्याने गुन्ह्याची कबुली देऊन त्याचे गुन्हयातील इतर साथिदार अलीनजिर अहमद खान, (22 वय) रवीकुमार देवनारायण गौतम, (26 वय), आकाश राकेशकुमार मोदनवाल, (22 वय), आरोपी हे (रा.उपाध्याय चाळ, डोंगरपाडा रोड, दुबे स्कुल जवळ, बिलालपाडा, नालासोपारा पुर्व) यांना ताब्यात घेऊन गुन्हयात अटक केलेली आहे. आरोपींनी जबरी चोरी केलेली गुन्हयातील 100 टक्के मुद्देमाल आणि गुन्हा करतांना वापरलेली इटिंगा कार हस्तगत करण्यात आलेले आहेत. गुन्हयाचा तपास वरिष्ठांच्या मार्गदर्शन व सुचनांप्रमाणे विरार पोलीस ठाणे गुन्हे प्रकटीकरण पथकाचे अधिकारी व अंमलदार तसेच तपासी अधिकारी यांनी अथक परिश्रम घेऊन गुन्हा उघडकीस आणलेला आहे.

पोलीस पथक
जयंत बजबळे, पोलीस उप-आयुक्त, परिमंडळ-3, बजरंग देसाई, सहाय्यक पोलीस आयुक्त, विरार विभाग, विजय पवार, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, सुशीलकुमार शिंदे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश फडतरे,स्वप्नील कदम, पोलीस उपनिरीक्षक अविनाश हाटखिळे, पोलीस हवालदार सचिन लोखंडे, संदिप जाधव, विशाल लोहार, इंद्रनिल पाटील, संदिप शेरमाळे तसेच पोलीस अंमलदार मोहसीन दिवाण, सचिन बळीद, बालाजी गायकवाड, प्रफुल सोनार, संदिप शेळके, सोमनाथ घनवट यांनी कामगिरी यशस्वीरित्या पार पाडली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0