क्रीडा
Trending

IND vs NZ 2nd Test Day 3 Live Score: भारत आणि न्यूझीलंड दुसऱ्या कसोटी सामन्यात भारताला विजयासाठी 359 धावांचे लक्ष

 IND vs NZ 2nd Test Day 3 Live Score: कॅप्टन रोहित शर्मा 34 धावावर बाद, लंच टाईमापर्यंत भारताचे धावसंख्या 81 झाली आहे

BCCI :- भारत आणि न्यूझीलंड IND VS NZ यांच्यात तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसरा सामना पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनमध्ये खेळला जात आहे. याआधी या मालिकेतील पहिला सामना बेंगळुरूमध्ये खेळवण्यात आला होता. बंगळुरू कसोटीत टीम इंडियाला पराभवाचा सामना करावा लागला होता. आता टीम इंडिया पुणे कसोटीतही पराभवाच्या उंबरठ्यावर असल्याचे दिसत आहे.

359 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारतीय संघाने तिसऱ्या दिवशी लंच पर्यंत एक गडी गमावून 81 धावा केल्या आहेत. भारताला आता विजयासाठी आणखी 278 धावा करायच्या आहेत. रोहित शर्माची बॅट चालली नसली तरी यशस्वी जैस्वालच्या धावांच्या वेगात काही फरक पडला नाही.शुभमन गिलही जबरदस्त फॉर्ममध्ये दिसत आहे. यशस्वी जैस्वाल 36 चेंडूत 46 धावांवर खेळत आहे. त्याने 3 चौकार आणि 3 षटकार मारले आहेत. शुभमन गिल 20 चेंडूत 4 चौकारांच्या मदतीने 22 धावांवर खेळत आहे. दोघांमध्ये 38 चेंडूत 47 धावांची भागीदारी आहे.

भारताने 34 धावांवर पहिली विकेट गमावली. कर्णधार रोहित शर्मा 16 चेंडूत आठ धावा करून बाद झाला. मिचेल सँटनरने हिटमनला पॅव्हेलियनमध्ये पाठवले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0