Ambernath Murder News : पूर्ववैमनस्यातून डोक्यावर व मानेवर, छातीवर धारदार शस्त्राने वार करून एकाची हत्या ; अंबरनाथ शहरांमधील घटना
Ambernath Murder News : अंबरनाथ शहरात पूर्ववैमनस्यातून तरुणाच्या डोक्यावर व मानेवर, छातीवर धारदार शस्त्राने वार करून निर्घृण खून करण्यात आला, महेश्वरी हॉस्पिटल जवळील घटना
अंबरनाथ :- अंबरनाथ शहरात पूर्ववैमनस्यातून तरुणाच्या डोक्यावर व मानेवर, छातीवर धारदार शस्त्राने वार करून निर्घृण खून करण्यात आला.Ambernath Murder News गुरुवारी रात्री दरम्यान अंबरनाथ येथील महेश्वरी हॉस्पिटल येथील सार्वजनिक रोडवरील येथे ही घटना घडली. आरोपी गौरव उडाणशिवे याने धारदार शस्त्राने केलेल्या वार केल्याने उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.
याप्रकरणी चुलत भाऊ मनीष बिहारीलाल दुसेजा (38 वय,रा. संत रामदास हॉस्पिटल जवळ उल्हासनगर 4). यांनी अंबरनाथ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी आरोपीच्या विरोधात बीएनएस कलम 103 सह महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 37 (1),135 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गुन्हयातील आरोपी गौरव उडाणशिवे याचे बाबत तात्काळ माहिती प्राप्त करुन त्याचे राहते घरी इंदिरानगर, उल्हासनगर.5 येथे जावुन आरोपीची आई, भाऊ यांचेकडुन माहिती प्राप्त करुन आरोपी याने दोन महिन्यापुर्वी पुजा खवळे हिचेशी लग्न केल्याची माहिती मिळाल्याने त्यांचे घराबाबत माहिती मिळुन तपास केला असता दोघे नवरा बायको हे कपडयाची बॅग भरुन गेल्याची माहिती मिळाल्याने तात्काळ वरिष्ठांचे मार्गदर्शनाप्रमाणे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल जगताप, पोलीस निरीक्षक (गुन्हे) सिध्देश्वर कैलासे, पोलीस उपनिरीक्षक गणेश मोरे, पोलीस उपनिरीक्षक संग्राम मालकर, पोलीस उपनिरीक्षक अंकुश सुरेवाड, पोलीस उपनिरीक्षक अर्जंन जाधव, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक गायकवाड, पोलीस हवालदार बर्वे,बांगारा,गुरव,राजवाळ, पोलीस नाईक कराळे, पोलीस शिपाई महाले, बडे, घाडगे यांचेसह वेगवेगळया टिम बनवुन आरोपीचा अंबरनाथ, विठ्ठलवाडी, उल्हासनगर, कल्याण रेल्वे स्टेशन परीसरात शोध घेवुन 5 तासामध्ये आरोपी गौरव किरण उडणशिवे (23 वय धंदा – काहीनाही रा. इंदिरानगर, महेश्वरी हॉस्पिटलचे मागे, उल्हासनगर-5 ) ताब्यात घेतलेले आहे. आरोपीकडे विचारपुस करता 15 दिवसापुर्वी झालेल्या भांडणाचा राग मनात धरुन धारदार कैचीने वार केलेबाबत सांगत आहे. आरोपी (25 ऑक्टोबर) सकाळी दरम्यान अटक करण्यात आली आहे. गुन्हयाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक (गुन्हे) सिध्देश्वर कैलासे हे करीत आहेत.