Eknath Shinde Visit To Guwahati : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गुवाहाटी ला जाऊन कामाख्या देवीचे घेतले दर्शन
•एकनाथ शिंदे पुन्हा एकदा गुवाहाटी ला जाऊन कामाख्या देवीचे घेतले दर्शन, विधानसभा प्रचारा पूर्वी पुन्हा एकदा कामाख्या देवीकडे
ANI :- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना शिंदे गटाकडून 45 उमेदवारांची अधिकृतपणे घोषणा केली. एकनाथ शिंदे पुन्हा एकदा पाचपाखाडी या विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार असून विद्यमान आमदारांना उमेदवारी जाहीर केले आहे. परंतु, राज्यात निवडणुकीची रणधुमाळी उडाली असताना एकनाथ शिंदे गुवाहाटी ला जाऊन कामाख्या देवीचे दर्शन घेतले आहे.
एकनाथ शिंदे विधानसभा निवडणुकीचा अर्ज दाखल करण्यापूर्वी गुवाहाटी ला दाखल झाले आहे. अडीच वर्षांपूर्वी एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारला होता आणि आपल्या सोबत सर्व आमदारांना गुवाहाटी येथे नेले होते. त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी भाजपासोबत हात मिळवणे करत एकत्र सरकार बसून मुख्यमंत्री झाले होते. त्यानंतर त्यांनी पुन्हा गुवाहाटी ला जाऊन कामख्या देवीचे दर्शन घेतले होते. आज पुन्हा एकनाथ शिंदे विधानसभेच्या निवडणुकीच्या उमेदवाराचा अर्ज भरण्यापूर्वी सहकुटुंब गुवाहाटी जाऊन कामाख्या देवीचे दर्शन घेतले आहे.