Voter Registration in Maharashtra : मतदार यादीत नाव नोंदणी करण्यासाठी आज (19 ऑक्टोबर) शेवटची संधी
Last Day for Voter Registration in Maharashtra: अठरा वर्षे पूर्ण झालेल्या नवीन मतदारांसाठी तसेच ज्यांचे मतदान यादीत नाव नाही त्यांच्यासाठी निवडणूक आयोगाकडून मतदान यादीत नाव नोंदवण्याची अंतिम संधी
Maharashtra Vidhan Sabha Election : विधानसभा सार्वत्रिक निवडणूक सन 2024 चा कार्यक्रम जाहीर झाला असून 20 नोव्हेंबर रोजी महाराष्ट्रातील एकूण 288 विधानसभा मतदारसंघात एकाच टप्प्यात मतदान घेण्यात येणार आहे. या निवडणुकीत आपला मतदानाचा हक्क बजावता यावा, यासाठी आपले नाव मतदार यादीत समाविष्ट असणे आवश्यक आहे, ज्यांनी आपले नाव मतदार यादीत अद्याप समाविष्ट केलेले नाही त्यांना अजूनही 19 ऑक्टोबर 2024 पर्यंत मतदार यादीत आपले नाव नोंदवण्याची संधी आहे, तरी आपले नाव आर्वजून मतदार यादीत समाविष्ट झाले असल्याची खात्री प्रत्येक मतदाराने करावी.
आजच electoralsearch.eci.gov.in ह्या दुव्याला (link) भेट देऊन किंवा Voter Helpline ॲपवर मतदार यादीत आपले नाव तपासून घ्यावे. नाव नसेल तर त्वरीत मतदार नोंदणी करावी, तातडीने 19 ऑक्टोबरच्या आत आपले नाव मतदार यादीत नोंदवावे, जेणेकरुन मतदानाच्या दिवशी मतदानाचा आपला हक्क मतदारांना बजावता येईल, असे आवाहन मुख्य निवडणूक अधिकारी तथा प्रधान सचिव एस.चोक्कलिंगम यांनी केले.
अजूनही ज्यांनी आपले नाव मतदार यादीत नोंदवलेले नाही त्यांना आज (19 ऑक्टोबर) रोजी रात्री पर्यंत ऑनलाईन किंवा ऑफलाईन पद्धतीने मतदार यादीत नाव नोंदणी करण्याची संधी उपलब्ध असून निरंतर मतदार नोंदणीचा कार्यक्रम अद्याप सुरु आहे. त्यामुळे ज्या पात्र नागरिकांची आतापर्यंत मतदार नोंदणी झालेली नाही, अशा नागरिकांकडून उमेदवारांचे नामनिर्देशनपत्रे दाखल करण्याच्या अंतिम दिनांकाच्या 10 दिवस अगोदरपर्यंत म्हणजेच 19 ऑक्टोबर पर्यंत प्राप्त झालेले अर्ज क्र. 6 मतदार यादीमध्ये नोंद घेण्यासाठी विचारात घेण्यात येतील. तरी या संधीचा लाभ घेऊन सर्व पात्र नागरिकांनी मतदार यादीत आपले नाव समाविष्ट करत मतदानाचा आपला हक्क आर्वजून बजावावा, तसेच सर्व मतदारांनी आपले नाव मतदार यादीत समाविष्ट असल्याची खात्री तातडीने करुन घ्यावी, असे आवाहन चोक्कलिंगम यांनी केले आहे.
पहा आवश्यक कागदपत्रं कोणती?
https://twitter.com/CEO_Maharashtra/status/1847520246883897375
ऑनलाईन कसं तपासाल तुमचं नाव यादीमध्ये आहे का?
- voters.eci.gov.in ला भेट द्या.
- होम पेज वर Search in Electoral Roll वर क्लिक करा.
- आवश्यक माहिती टाका.
- तुमचं नाव, पोलिंग बुथ आणि अन्य सारे तपशील तुमच्या समोर दिसतील.