मुंबईक्राईम न्यूज
Trending

Navi Mumbai Crime News : वरिष्ठ पोलीस निरीक्षकाला एसीबीच्या बेड्या, साडेतीन लाखाची लाच स्वीकारताना रंगेहात पकडले

•Navi Mumbai Senior police inspector caught red-handed accepting bribe of three and a half lakhs नवी मुंबई : एनआरआय पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक सतीश कदम यांना लाचलुचपत विभागाकडून मंगळवारी मध्यरात्री अटक!

नवी मुंबई :- नवी मुंबईतील एन.आर.आय. पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश कदम यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) बुधवारी अटक केली आहे. Navi Mumbai Crime News जामीन मिळवून देण्यास मदत करण्यासाठी 3.50 लाख रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी एसीबीने वरिष्ठ पोलीस निरीक्षकाला बेड्या ठोकल्या आहे. त्यांच्याविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक कायदा 1988 च्या कलम 7 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

एसीबीने दिलेल्या माहितीनुसार शाहबाज गाव येथे इमारत कोसळल्याची घटना सप्टेंबर महिन्यात घडली होती. Navi Mumbai Crime News या दुर्घटने प्रकरणी जागा मालक, विकासक यांच्यासोबत गुंतवणूकदार महेश कुंभार याच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र महेश कुंभार यांचा दुर्घटनेशी संबंध नसतानाही त्यांना जाणीवपूर्वक अडकवले गेल्याचा कुटुंबीयांचा आरोप होता. या गुन्ह्यात सहकार्यासाठी एनआरआय पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश कदम यांनी कुंभार यांच्याकडे 50 लाख रुपये मागितल्याचा आरोप आहे. तडजोड अंती त्यांनी 12 लाख रुपये स्वीकारले होते असेही तक्रारदाराचा आरोप आहे. त्यानंतर कुंभार यांच्यावर इतर एक कारवाईचा धाक दाखवून त्यांच्या मुलाकडे 12 लाख रुपयांची मागणी करण्यात आली होती. तडजोड करुन 4 लाख रुपये घेण्याची तयारी कदम यांनी दाखवली होती. मात्र पैशांसाठी त्यांच्याकडून सतत होत असलेल्या त्रासाला कंटाळून तक्रारदार यांनी लाचलुचपत प्रतिबंध विभागाच्या मुंबईच्या मुख्य विभागाकडे तक्रार केली होती. Navi Mumbai Crime News त्यावरून मंगळवारी मध्यरात्री उलवे येथे सतीश कदम यांच्या राहत्या परिसरात सापळा रचून लाचेचे 4 लाख रुपये घेताना त्यांना अटक करण्यात आली. याप्रकरणी पहाटेच्या सुमारास एनआरआय पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0