क्राईम न्यूजपुणे
Trending

Pune Crime News : पुण्यात पिस्टल (बंदूक)विक्री; बंदुकासोबत 5 काडतुसे जप्त

Chandan nagar Police Arrested Accused Accused With Gun : पिस्टल (बंदूक) विक्रीसाठी येणार असल्याची गुप्त माहिती चंदननगर पोलीसांना मिळताच पोलीसांनी सापळा रचून सराईत गुन्हेगार समाधान लिंगाप्पा विभुते आरोपींला अटक केली आहे.

पुणे :- चंदननगर पोलीस ठाण्याच्या Pune Chandan Nagar Police Station हद्दीतील सुंदराबाई शाळा परिसरात पिस्टल(बंदूक) विक्री Pune Gun Selling करणाऱ्या एका सराईत आरोपीला चंदन नगर पोलीसांनी अटक केली आहे.पिस्टल विक्रीसाठी येणार असल्याची गुप्त माहिती पोलीसांना मिळताच पोलीसांनी सापळाला अजून दयानंद समाधान लिंगाप्पा विभुते (32 वय, रा.पळशी सुपली ता. पंढरपुर)अटक केली आहे. Pune Latest Crime News

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, चंदन नगर पोलीस ठाण्याच्या तपास पथकातील पोलीस उपनिरीक्षक राहुल कोळपे, पोलीस अंमलदार श्रीकांत कोद्रे, सुरज जाधव, शेखर शिंदे असे पोलीस ठाण्याच्या हद्दीत कर्तव्यावर असताना पोलीस अंमलदार श्रीकांत कोद्रे आणि सुरज जाधव यांना त्यांच्या गोपनीय बातमीदारामार्फत बातमी मिळाली होती की, सराईत गुन्हेगार असलेल्या समाधान विभुते हा चंदन नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या सुंदराबाई शाळे येथे पिस्टल विक्री करण्यासाठी येणार आहे अशी माहिती मिळाली होती. पोलीसांनी सापळा रचला आहे अशी चाहूल लागतात आरोपी समाधान हा तिथून त्याच्या दुचाकीवरून पळाला पोलीसांनी सिनेस्टाईलने आरोपी समाधान याचा पाठलाग करत त्याला ताब्यात घेतले. पोलीसांनी त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे असलेल्या बॅगेमध्ये एक पिस्टल आणि पाच जिवंत काडतुसे सापडले आहे. पोलीसांनी आरोपीकडून 95 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. आरोपीविरुद्ध चंदन नगर पोलीस ठाण्यात भारतीय अधिनियमन कलम 3(25), महाराष्ट्र पोलीस अधिनियमन कलम 37(1),(3),135 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीला अटक करून त्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक राहुल कोळपे हे करत आहे. Pune Latest Crime News

पोलीस पथक
पोलीस उप आयुक्त, परिमंडळ 4 हिम्मत जाधव, सहाय्यक पोलीस आयुक्त, येरवडा विभाग- प्रांजली सोनवणे, यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय चव्हाण, पोलीस निरीक्षक (गुन्हे) अनिल माने, चंदननगर पोलीस ठाणे पुणे शहर, तपास पथक प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय लिगाडे, पोलीस उपनिरीक्षक राहुल कोळपे, पोलीस अंमलदार रामचंद्र गुरव, विश्वनाथ गोणे, नानासाहेब पतुरे, महेश नाणेकर, सचिन रणदिवे, शिवाजी धांडे, श्रीकांत कोद्रे, सुरज जाधव, शेखर शिंदे, विकास कदम, प्रफुल मोरे, नामदेव गडदरे, सचिन पाटील, अमोल जाधव यांनी केली आहे. Pune Latest Crime News

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0