क्राईम न्यूजठाणेमुंबई
Trending

Mumbai Crime News : ‘बनावट ग्राहक’ बनून पोलिसांचा सापळा; विक्रोळीत बोगस नोटांच्या टोळीचा पर्दाफाश

Mumbai Latest Fraud News : 25 हजारात 1 लाखांच्या बनावट नोटा देण्याचे आमिष; चार आरोपी गजाआड

मुंबई :- भारतीय चलनाच्या बनावट नोटा देऊन फसवणूक करणाऱ्या एका मोठ्या टोळीचा गुन्हे शाखा कक्ष-6 च्या पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. सोमवारी रात्री विक्रोळी परिसरात सापळा रचून पोलिसांनी या टोळीतील चार आरोपींना अटक केली आहे. त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात बनावट नोटा, एक मोटारगाडी आणि सहा मोबाईल हस्तगत करण्यात आले आहेत. Mumbai Latest Crime News

गुन्हे शाखा कक्ष-6 च्या Mumbai Crime Branch Unit 6 अधिकाऱ्यांना मुंबईत बनावट नोटांची विक्री करणाऱ्या एका टोळीची माहिती मिळाली होती. त्यानुसार, पोलिसांनी ‘बनावट ग्राहक’ बनून त्यांच्याशी संपर्क साधला. आरोपी 25 हजार रुपयांच्या बदल्यात 1 लाख रुपयांच्या बनावट नोटा देत असल्याचे या चौकशीत समोर आले. पोलिसांनी या टोळीला नोटांच्या व्यवहारासाठी विक्रोळीतील फिरोजशहा नगर येथे बोलावले.

सोमवारी रात्री 11 च्या सुमारास पोलिसांनी सापळा रचून नफिस खान, मंजर सोंडे, सईद सिद्धीकी आणि मोसीन चौधरी या चार आरोपींना ताब्यात घेतले. हे आरोपी जास्त नफ्याचे आमिष दाखवून लोकांना फसवणूक करत होते. पोलिसांनी त्यांच्या ताब्यातून एक कार आणि सहा मोबाईल फोन जप्त केले आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0