Panvel News : माजी नगरसेविका मुग्धा लोंढे यांच्या स्मरणार्थ रक्तदान शिबीर; १८२ दात्यांनी केले रक्तदान
पनवेल : स्वर्गीय मुग्धा लोंढे यांनी आपले संपुर्ण आयुष्य हे समाजाची सेवा करण्यासाठी दिले. दुर्दैवाने ते आपल्यातून गेल्या मात्र त्यांच्या स्मृर्ती या सेवा कार्यातून राहाव्यात यासाठी स्वर्गीय सौ मुग्धा लोंढे सेवा प्रतिष्ठाणच्या माध्यामतून विविध उपक्रम राबवले जातात आणि पुढील काळातही अशीच सेवा सुरु रहावी, अशी अपेक्षा आमदार प्रशांत ठाकूर यांनी रक्तदान शिबिरावेळी व्यक्त केली. विरुपाक्ष मंगल कार्यालयात झालेल्या रक्तदान शिबीराला उस्त्फूर्त प्रतिसाद लाभला असून १८२ रक्तदात्यांनी रक्तदान केले. या रक्तदान शिबीराला माजी सभागृहनेते परेश ठाकूर यांनीही भेट देऊन शुभेच्छा दिल्या. Panvel Latest News
पनवेल महानगरपालिकेच्या माजी नगरसेविका स्वर्गिय मुग्धा गुरुनाथ लोंढे यांच्या पाचव्या स्मृतीदिनानिमीत्त स्वर्गीय सौ मुग्धा लोंढे सेवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून बुधवारी पनवेल शहरातील विरुपाक्ष मंगल कार्यालयात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबीराचे उद्घाटन पनवेल विधानसभा मतदार संघाचे आमदार प्रशांत ठाकूर यांच्याहस्ते आणि भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी यांच्या उपस्थितीत झाले. या वेळी भाजपचे प्रदेश सदस्य बाळासाहेब पाटील, प्रदेश सरचिटणीस विक्रांत पाटील, उत्तर रायगड जिल्हा सरचिटणीस नितीन पाटील, पनवेल शहर अध्यक्ष अनिल भगत, उपाध्यक्ष अमित ओझे, महिला मोर्चा शहर अध्यक्षा राजश्री वावेकर, माजी नगरसेवक राजू सोनी, अजय बहिरा, माजी नगरसेविका दर्शना भोईर, रुचीता लोंढे, वर्षा ठाकूर, अभिषेक पटवर्धन, केदार भगत, अमोघ ठाकूर, अंजली इनामदार यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मान्यवर उपस्थित होते. या रक्तदान शिबीरात १८२ दात्यांनी रक्तदान केले असून त्यांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले. Panvel Latest News