Ajit Pawar News | अजितदादांचा ‘कार्यक्रम’ : महिलांनी भर कार्यक्रमातून घेतला काढता पाय
Ajit Pawar News

- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी कार्यक्रमाला दांडी मारली?
सातारा/पुणे, दि. ३ ऑक्टोबर, महाराष्ट्र मिरर : Ajit Pawar News
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार Ajit Pawar यांचा Satara साताऱ्यात ‘कार्यक्रम’ झाला आहे. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा अमृत महोत्सव सांगता सोहळा चर्चेचा विषय ठरत आहे. सैनिक स्कूलच्या मैदानावर भव्य मंडपात सुरु असलेल्या कार्यक्रमातून लोकांनी पाठ फिरवल्यानं निम्मा मंडप रिकामा पडल्याचं चित्र पाहायला मिळालं. बँकेशी संलग्न असलेल्या विविध कार्यकारी सहकारी सोसायट्यांच्या महिला पदाधिकाऱ्यांनी कार्यक्रमातून काढता पाय घेतला.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे CM Eknath Shinde आणि देवेंद्र फडणवीस Devendra Fadanvis यांनी कार्यक्रमाला दांडी मारली?
यापूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस हे कार्यक्रमासाठी येतील अशी चर्चा होती पण ऐनवेळी दांडी मारल्याने नेमकं कारण काय याची चर्चा आहे.
सातारा जिल्ह्याने अजित पवारांना मोठी ताकद दिली होती. अजितदादा साताऱ्यात येणार म्हटलं की तरूणांपासून ते वृध्द कार्यकर्त्यांपर्यंत झाडून सर्वजण दादांच्या स्वागताला हजर असायचे. त्यांचा प्रत्येक दौरा झंझावाती व्हायचा. कार्यक्रमात टाळ्या, शिट्ट्या ऐकायला मिळायच्या. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर अजितदादांनी पश्चिम महाराष्ट्राचा दौरा केला होता. त्यालाही मोठा प्रतिसाद मिळाला होता. मात्र, साताऱ्यातील त्यांचा मंगळवारचा कार्यक्रम पूर्णपणे फ्लॉप झाला.
अमृत महोत्सव सांगता कार्यक्रमाला पालकमंत्री शंभूराज देसाई यांना पालकमंत्री म्हणून आमंत्रित केलं होतं. वास्तविक, पालकमंत्र्यांचे आजोबा, लोकनेते दिवंगत बाळासाहेब देसाई यांचं बँकेच्या स्थापना आणि जडणघडणीत मोठं योगदान होतं. परंतु, आजवर बँकेचे संचालक देखील नसताना शंभूराज देसाईंची कार्यक्रमातील हजेरी अनेकांना खटकली. त्यामुळे पाटणमधील शरद पवार गटाच्या लोकांनी या कार्यक्रमाकडे पाठ फिरवल्याचं दिसलं.
एकेकाळी संपूर्ण सातारा जिल्ह्यावर पकड निर्माण केलेल्या लोकनेते दिवंगत शिस्तीमुळे सातारा जिल्हा बँक विलासकाका उंडाळकर यांच्या कडक शिस्तीमुळं सहकारातील अग्रगण्य बँक बनली. पारदर्शक कारभारामुळे नाबार्डने सातारा जिल्हा बँकेला अनेकदा गौरवलं आहे. त्याचं श्रेय विलासकाका उंडाळकरांना दिलं जातं. अमृत महोत्सवाच्या आढाव्यात उंडाळकरांच्या योगदानाची कुठे दखल घेण्याची तसदी विद्यमान संचालक मंडळानं घेतली नसल्याचंही पाहायला मिळालं.