Panvel Crime News | पनवेल : गोर गरीब मुलींना वेश्याव्यवसायात ओढणारा दलाल जेरबंद : ‘पिटा’ अंतर्गत कारवाई
- अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक पथकाकडून कारवाई | Panvel Crime News
- अल्पवयीन बांगलादेशी मुलीसह तीन महिलांची सुटका
नवी मुंबई, दि. २३ सप्टेंबर, महाराष्ट्र मिरर
मुबारक जिनेरी
Panvel Crime News | गोर गरीब मुलींचा, महिलांचा देह व्यवसायासाठी उपयोग करणारा दलाल नवी मुंबई अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक पथकाकडून जेरबंद करण्यात आला आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक पृथ्वीराज घोरपडे (Senior Police Inspector Pruthaviraj Ghorpade) यांच्या पथकाकडून सदर धडाकेबाज कामगिरी करण्यात आली आहे.
आरोपी वैजद अली खान उर्फ राजू मंडल (raju mandal), वय – २९ असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. तर संशयित मोतीन व शायना यांचा पोलीस शोध घेत आहेत.
शुक्रवारी रात्री अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक पथकाकडून वरिष्ठ पोलीस निरीक्षक पृथ्वीराज घोरपडे यांच्या नेत्तृत्वाखाली पनवेल मधील करंजाडे परिसरात सापळा कारवाईत या दलाला अटक करण्यात आली. यासंबंधित आणखी दोघांचा शोध पोलीस घेत आहेत.
सापळा कारवाईत तीन महिला व एक बांगलादेशी महिला यांची सुटका करण्यात आली. आरोपी वैजद अली खान उर्फ राजू मंडल हा कुख्यात दलाल असून तो मोतीनच्या साथीने गरीब महिलांना पैशाचे आमिष देऊन त्यांच्याकडून वेश्याव्यवसाय करून घेत होता. तसेच कारवाईत आढळून आलेल्या अल्पवयीन बांगलादेशी मुलीचा पुरवठा शायना या महिला दलालाने केला असल्याची माहिती उघडकीस आली आहे.
याबाबत पनवेल शहर पोलीस ठाण्यात तिघांविरोधात पिटा अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे.