Viva College Organized Carrier Katta: ” करिअर कट्टा” ह्या उपक्रमाअंतर्गत महाराष्ट्र शासनाच्या वतीने “राज्यस्तरीय पुरस्कारा” ने गौरविण्यात आले
विरार : विद्यार्थ्यांच्या उज्वल भविष्यासाठी वेगवेगळे उपक्रम राबविणे आणि विद्यार्थ्यांच्या अंगी असलेल्या क्षमतेनुसार, त्यांच्यासाठी करिअरच्या विविध वाटा निर्माण करण्याकरिता विवा महाविद्यालय नेहमीच वेगवेगळे उपक्रम व कार्यशाळा राबवत असते. या चांगल्या कार्याचा परिणाम म्हणून विरार येथील विष्णू वामन ठाकूर चरिटेबल ट्रस्टचे भास्कर वामन ठाकूर कॉलेज ऑफ सायन्स, यशवंत केशव पाटील कॉलेज ऑफ कॉमर्स, विद्या दयानंद पाटील कॉलेज ऑफ आर्ट्स (विवा महाविद्यालयाला) ” करिअर कट्टा” Viva College Virar ह्या उपक्रमाअंतर्गत महाराष्ट्र शासनाच्या वतीने “राज्यस्तरीय पुरस्कारा” ने गौरविण्यात आले आहे.
प्रथम क्रमांकाचा उत्कृष्ठ महाविद्यालयाचा राज्यस्तरीय पुरस्कार, १ लाख रुपयांचा धनादेश व सन्मान चिन्ह , उत्कृष्ट जिल्हास्तरीय महाविद्यालय, उत्कृष्ट विभागीय महाविद्यालय, उप प्राचार्या डॉ.दीपा वर्मा यांना उत्कृष्ट राज्यस्तरीय जिल्हा समन्वयक तसेच उत्कृष्ट जिल्हा समन्वयक, डॉ. रोहन गव्हाणकर यांना उत्कृष्ट जिल्हास्तरीय महाविद्यालयीन समन्वयक, महाविद्यालयाला उत्कृष्ट पालघर जिल्हास्तरीय करिअर संसद अश्या विशेष 7 उल्लेखनीय पुरस्कारामुळे विवा महाविद्यालयाचे नाव फक्त पालघर जिल्ह्यातच नाहीतर संपूर्ण महाराष्ट्रभर गाजत आहे.
करिअर कट्टाचे Carrier Katta अध्यक्ष यशवंत शितोळे, सोमैया विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू प्रा. व्ही. एन. राज, सेखरन पिल्लई, खादी ग्रामोद्योगाचे संचालक बिपिन जगताप उच्च तंत्र चे सह संचालक डॉ.संजय जगताप, डॉ. हरिभाऊ शिंदे, डॉ. उदय निरगुडकर, प्रफुल्ल पाठक, सुनील झोडे, संजय इंगळे यांच्या प्रमुख उपस्थित मुंबई येथे हा पुरस्कार सोहळा पार पडला. या प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत विवा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वी. एस. अडिगल, उप प्राचार्या डॉ. दीपा वर्मा यांनी राज्यस्तरीय पुरस्कार स्वीकारला.
करियर कट्टा संकल्पनेतून विद्यार्थ्यांच्या अंगी असलेल्या कला गुणांचा सर्वांगीण व सक्षम विकास होऊन विद्यार्थी उत्तम उद्योजक बनला पाहिजे या हेतूने महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्र शिक्षण विभाग व महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने “करिअर कट्टा” हा उपक्रम चालू करण्यात आलेला आहे. विद्यार्थ्यांना मार्गदर्शक शिक्षण प्रणाली पद्धतीच्या माध्यमातून विविध स्पर्धा परीक्षा, व्यवसाय, उद्योग, विकास यांचे शिक्षण पुरविण्याचे कार्य या उपक्रमाद्वारे करण्यात येत आहे. या उपक्रमाला आता पर्यंत विद्यार्थ्यांचा प्रचंड प्रमाणात सकारात्मक प्रतिसाद देखील मिळाला आहे. आयोजित उपक्रमाचा लाभ पालघर जिल्ह्यातील सर्व विद्यार्थ्यांना घेता यावा यासाठी करिअर कट्टाची संपूर्ण टीम मोठ्या प्रमाणावर मेहनत घेते.
महाविद्यालयाच्या या विशेष उल्लेखनीय यशाबद्दल विष्णू वामन ठाकूर चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष हितेंद्र ठाकूर, ट्रस्टच्या सेक्रेटरी अपर्णा ठाकूर, व्यवस्थापन समितीचे सदस्य संजीव पाटील, संजय पिंगुळकर, श्रीनिवास पाध्ये, महाविद्यालय समन्वयक नारायण कुट्टी, विवा महाविद्यालयाच्या उपप्राचार्या डॉ. प्राजक्ता परांजपे, महाविद्यालयातील प्राध्यापक वर्ग यांनी अभिनंदन केले.