Uncategorized
Trending

Ganesh Visarjan 2024 : गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या…”

Ganesh Visarjan 2024: पुण्याचे मानाचे गणपती तसेच मुंबईचे गणपती विसर्जना करिता मार्गस्थ

मुंबई :- ढोल-ताशांच्या गजरात “गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या…” असा जयजयकार करत संपूर्ण राज्यात विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झाली आहे. Ganesh Visarjan 2024 संपूर्ण राज्यात अतिउत्साहात बाप्पांची सांगता मिरवणूक होत आहे. लाडक्या बाप्पाला निरोप देताना भक्तांचा कंठ दाटून येत आहे. पुण्यातील विसर्जन मिरवणूक थाटामाटात निघाली आहे. पुण्यात पारंपरिक थाटामाटात गणेशोत्सव साजरा केला जातो. पुण्यातील पहिल्या पाच मानाच्या गणपतींच्या विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झाली आहे.मुंबईसह राज्याभरात जल्लोषात गणपती बाप्पांच्या मिरवणुकीला सुरूवात झाली आहे. लालबागच्या राजाला निरोप देण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी झाली आहे. मुंबई आणि पुण्यामध्ये गणपती विसर्जनाच्या मिरवणुका साधारणतः 22 ते 24 तास चालत आहे. Ganesh Visarjan 2024

पुण्यातील पाच मानाचे गणपती

गणपतींच्या विसर्जनाच्या मिरवणूकीची सुरुवात होते. यानंतर क्रमाने तांबडी जोगेश्वरी गणपती, गुरुजी तालीम गणपती, तुळशीबाग गणपती, केसरी गणपती या मंडळांचे गणपती मिरवणूकीत येतात. केसरीवाड्याच्या गणपतीनंतर इतर मंडळे आपले गणपती आधी ठरवून दिलेल्या क्रमाने मिरवणुकीत आणतात. Ganesh Visarjan 2024

  • कसबा गणपती (हे पुण्याचे ग्रामदैवत आहे)
  • तांबडी जोगेश्वरी गणपती
  • गुरुजी तालीम गणपती
  • तुळशीबाग गणपती
  • केसरीवाडा गणपती

मुंबईचा लालबागचा राजा, गणेश गल्लीचा मुंबईचा राजा, चिंतामणी, तेजू काया यांसारख्या गणपतीचेही विसर्जनाच्या मिरवणुका निघाले आहे. लालबागच्या राजाची महाआरती झाली असून कोळी बांधवांच्या पारंपारिक नृत्याने लालबागच्या राजाला निरोप देण्याचे परंपरा आहे. कोळी बांधवांच्या नृत्यूनंतर लालबागचा राजा मार्गस्थ झाला आहे. गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या जयघोषाने दुमदुमली आहे. Ganesh Visarjan 2024

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0