क्राईम न्यूजमुंबई
Trending

Police Bribe News : पाच हजारांची लाच स्वीकारताना पोलीस नाईक एसीबीच्या जाळ्यात

Anti Corruption Bureau Arrested Bhoisar Police Officer For Taking Bribe : बोईसर पोलीस ठाण्याचे पोलीस नाईक यांच्याविरुद्ध लाचेची मागणी प्रकरणी गुन्हा दाखल

पालघर :- तक्रारदाराच्या विरुद्ध बोईसर पोलीस ठाण्यात Bhoisar Police Station असलेल्या दाखल गुन्ह्यांमध्ये अटक न करण्याकरिता बोईसर पोलीस ठाण्याचे पोलीस नाईक यांनी 13 ऑगस्ट दरम्यान वीस हजार रुपयांची लाचेची मागणी Officer Asking 20 Thousand Bribe केली होती. त्यापैकी तक्रारदाराने दहा हजार रुपये रक्कम तात्काळ दिली होती. उर्वरितच रक्कम स्वीकारताना बोईसर पोलीस ठाण्याचे Bhoisar Police Station officer पोलीस नाईक हरेश नावजी ठाकरे यांना एसीबीने पाच हजारांची रक्कम स्वीकारताना रंगेहात पकडले आहे. त्यांच्याविरुद्ध बोईसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. Maharashtra Police Latest Bribe News

लाचलुचपत प्रतिबंध विभाग,ठाणे

एसीबीने दिलेल्या माहितीनुसार, बोईसर पोलीस ठाण्यात तक्रारदार यांच्या विरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम 115 118 (1), 351 (2),352 प्रमाणे गुन्हा दाखल आहे. तक्रारदार यांच्या विरुद्ध दाखल असलेल्या गुन्ह्यात अटक न करण्यासाठी पोलीस नाईक यांनी तक्रारदारांच्याकडे वीस हजार रुपयांची लाच मागितली होती. त्यामधील दहा हजार रुपये तक्रारदार यांनी त्वरित रक्कम दिली आणि उर्वरित रक्कम घेण्याकरिता पोलीस नाईक वारंवार तक्रारदारांना फोन करत होता. या सर्व प्रकरणाबाबत तक्रारदार यांनी एसीबीकडे पोलीस नाईक यांच्याविरुद्ध लाचेची तक्रार दिली होती . पोलीस नाईक तक्रारदार याच्यावर दहा हजारकरिता दबाव वाटत होता. तडजोडी अंती तक्रारदार यांच्याकडून पाच हजार स्वीकारताना एसीबीने अटक केली असून यापूर्वी दहा हजार रुपये स्वीकारण्याची कबुली दिली आहे. पोलीस नाईक यांच्याविरुद्ध बोईसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. Maharashtra Police Latest Bribe News

पोलीस अधीक्षक सुनिल लोखंडे, ला.प्र. वि. ठाणे,अपर पोलीस अधीक्षक गजानन राठोड,ठाणे यांच्या मार्गदर्शनाखाली हर्षल चव्हाण पोलीस उप अधीक्षक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, पालघर यांनी कारवाई केली आहे. Maharashtra Police Latest Bribe News

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0