क्राईम न्यूजमुंबई

Bhiwandi Crime News : पिस्तूल विक्रीच्या तयारीत असलेल्या तरुणाला बेड्या; पिस्तुलासह 4 जिवंत काडतुसे जप्त

Bhiwandi Crime News : भिवंडी नारपोली पोलीस ठाण्याची कारवाई ; बेकायदेशीर हत्यार बाळगल्या प्रकरणी एकाला अटक

भिवंडी :- बेकायदा शस्त्रविक्रीसाठी आलेल्या एका व्यक्तीला नारपोली पोलिसांच्या Narpoli Police Station पथकाने मुंबई-नाशिक महामार्ग, मोदी कंम्पाउंड परिसरातून अटक केली असून त्याच्याकडून एक बंदूक आणि चार जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत. Man Arrested With Gun And Pistol In Bhiwandi शशीपाल रज्जु जाटव (19 वर्ष) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून तो सकलुपुरा, राजस्थान येथे राहणारा आहे. Bhiwandi Crime News

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नारपोली पोलीस ठाण्याचे पोलिसांना मिळालेल्या माहितीवरून पोलीस उपनिरीक्षक पवार आणि पोलीस हवालदार म्हात्रे यांच्या पथकाने काल (2 ऑगस्ट) दुपारच्या दरम्यान बालाजी हॉटेल व पान शॉप जवळ, मुंबई-नाशिक महामार्ग मोदी कंम्पाउंड भिवंडी येथे एका संशयित आरोपीला ताब्यात घेतले. त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याजवळ बंदूक दोन मॅग्झिनसह, चार जिवंत काडतुसे जप्त केले आहे. पोलिसांनी आरोपीकडून मोबाईल फोन आणि रोख रक्कम असे इतर साहित्य जप्त केले असून आरोपीच्या विरुद्ध नारपोली पोलीस ठाण्यात बेकायदेशीर शस्त्र बाळगल्या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी आरोपीच्या विरोधात भारतीय हत्यार कायदा कलम 3,25 सह महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 37 (1),135 प्रमाणे गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे. गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक पवार हे करत आहे. Bhiwandi Crime News

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0