Sanjay Raut : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची माफी केवळ विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून मागितल्याचे संजय राऊत यांनी केला आरोप

Sanjay Raut On PM Modi : स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या मुद्द्यावर संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुस्तक भेट देणार असल्याचे सांगितले
मुंबई :- देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी PM Modi काल (30 ऑगस्ट) महाराष्ट्राच्या दौऱ्यावर होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजकोट येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा कोसळल्या प्रकरणी महाराष्ट्रातील जनतेची माफी मागितली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या माफीवर संजय राऊत यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित करत म्हणाले की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मागितलेली माफी हे केवळ आगामी विधानसभेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून मागितले असल्याचे ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी आरोप केला आहे.
संजय राऊत पुढे बोलताना म्हणाले की, सावरकरांचा विषय संपूर्ण वेगळा आहे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 6 सोनिरी पान हे पुस्तक त्यांना आम्ही वाचायला देऊ. काँग्रेसने काय करायचे हा काँग्रेसचा प्रश्न असेल पण आपण वीर सावरकरांना भारतरत्न का दिला नाही म्हणून आपण त्यांची माफी मागा, अशी मागणी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केली आहे.
संजय राऊत म्हणाले की, माफी मागून जर प्रश्न सुटत असतील तर माफी मागून टाकावी असा सल्ला या राज्यातील महायुतीच्या लोकांनी त्यांना दिलेला दिसतोय. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मागितलेली माफी ही संपूर्ण राजकीय आहे. त्या संकटातून सुटका करण्यासाठी त्यांनीही माफी मागितली आहे. या माफी मुळे प्रश्न सुटणार नाही, शिवरायांचा घोर अपमान महाराष्ट्रात झाला आहे.
उद्या राज्य सरकारला जोडे मारो आंदोलन
संजय राऊत म्हणाले की, महाराष्ट्रात सरकारला जोड्या मारण्याच्या कार्यक्रमात कोणताही बदल होणार नाही. उद्या 11 वाजता महाविकास आघाडीचे सर्व घटक पक्ष राज्यभरात छत्रपती शिवरायांच्या आगमनाबद्दल राज्य सरकारच्या पुतळ्यांना जोडे मारतील. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना या घटनेचे दुःख असते तर पुलवामात झालेल्या हत्याच्या वेळी त्यांनी देशाची माफी मागितली असती जम्मू-काश्मीरमध्ये काश्मिरी पंडितांची हत्या, देशभरात महिला अत्याचारमध्ये झालेली वाढ त्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदींनी माफी मागितली असतील, पण त्यांनी केवळ निवडणूक डोळ्यांसमोर ठेवून ही माफी मागितली आहे. मात्र, हा महाराष्ट्र त्यांना माफ करणार नाही, असे राऊतांनी म्हटले आहे.