Daund News : विकासाच्या नावाखाली रस्त्याचा खेळ खंडोबा ; रस्त्याच्या कामासाठी जगावे की मरावे ? ग्रामस्थांचा टाहो
[ खुटबाव पिंपळगाव रस्त्यावर रमेश गार्डन मंगल कार्यालयाजवळ भयानक परिस्थिती ]
दौंड, ता. २८ प्रत्येक पावसाळ्यात बांधकाम विभागाचे अधिकारी आणि ठेकेदार बांधकाम विभागाची लख्तरं वेशीवर टांगत आहे. प्रत्येक पावसाळ्यात खड्ड्याचं विदारक वास्तव उघडं पडत असताना प्रशासन मात्र त्यावर कोणतीही ठोस उपाययोजना करायला तयार नाही. काही रस्त्यांवरून राजकीय मंडळींचा सातत्याने वावर असल्यामुळे ते सुस्थितीत असतात. कितीही जोराचा पाऊस झाला तरीही ह्या रस्त्यांवर खड्डे पडत नाहीत. मग अन्य रस्ते त्याला अपवाद का ठरतात, असा प्रश्न उपस्थित झाल्यावर या खड्ड्यांमध्येही अर्थ दडला असल्याचे पुढे येते. रस्ता तयार झाल्यानंतर पुढील तीन वर्षे त्या रस्त्याच्या दुरुस्तीची सर्वार्थाने जबाबदारी ठेकेदारावर असते. एकीकडे दर्जाहीन रस्ते बनवणाऱ्या ठेकेदारावर मेहरबानी दाखवायची आणि दुसरीकडे संकट ही संधी या तत्वाने खड्ड्यांच्या नावाने आपले गल्लेही भरायचे. बांधकाम विभागाच्या सुरू असलेल्या या घाणेरड्या अर्थ कारणामुळे पावसाळ्यात खड्ड्यांची संख्या वाढलेली दिसते. Daund Latest News
रस्ता करताना या निकषांचे फारसे पालन होत नाही. त्याचे पालन केले तर खड्ड्यांतून मिळणाऱ्या मलिद्या ला मुकावे लागले. खरे तर खड्ड्यांची जबाबदारी केवळ ठेकेदारांचीच नाही तर अधिकाऱ्यांचीही आहे आणि तालुक्याचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या प्रतिनिधींचे सुद्धा आहे. पाऊस आला की दरवेळेस ठेकेदारांवर कारवाईची भाषा होते, पण ठेकेदाराबरोबरच अधिकाऱ्यांवर कारवाई का होत नाही ? असाही प्रश्न निर्माण होतो. Daund Latest News
प्रतिनिधींना पब्लिकच्या अडचणींची काही जाणीव देखील नाही. यामुळे प्रवासी तसेच वाहनधारक आणि शाळा महाविद्यालयासाठी येणारे विद्यार्थी, जेष्ठ नागरिक प्रवासी यांचे माञ अतोनात हाल होत आहेत. न भरुन निघणारे असे नुकसान होत आहे. या कामाचा ठेकेदाराने आणि अधिकाऱ्यांनी अगदी खेळ खंडोबा केला आहे. या मार्गावर धावणाऱ्या शालेय विद्यार्थ्यांना ने आण करणार्या बस सुद्धा या खड्ड्यात बंद पडत आहेत. या रस्त्यावर दुचाकी देखील चालवणं मुश्कील झाले आहे. त्या ठिकाणी अपघात होत आहेत. परंतु हा प्रकार काही सुधारणा होत नाही. Daund Latest News
रस्त्याच्या कामाबाबत सत्ताधाऱ्यांना सांगूनही ऐकत नाहीत ? तुम्ही तरी नागरिकांच्या समस्या सोडवा ! माजी आमदार रमेश थोरात यांना खुटबाव ग्रामस्थ व परिसरातील नागरिकांच साकडं…….. या रस्त्याची स्थिती पाक बिघडलेली आहे. आमची कोणी दखल घईना. आमदार, खासदार, रस्ता बघून निघून जात असून रस्त्याच्या प्रश्न मार्गी लावत नाहीत. या रस्त्यावरून शाळकरी मुले, शेतकऱ्यांना दूध, चारा घेऊन जाणे सुद्धा अवघड झाले असून आमच्या समोर जगायचे का मरायचे असा प्रश्न निर्माण झाला आहे. आजारी रुग्णांना दवाखान्यात घेवून जात असताना त्यांना ञास सहन करावा लागत आहे. वेळेवर दवाखान्यात पोहचू शकत नाही. रस्त्यावर सगळीकडे खड्डे पडले असल्याने ड्रायव्हर सुद्धा खड्डा चुकवू शकत नाही. या कामी माजी आ. रमेश थोरात यांनीच लक्ष घालून लोकांची ही अडचण सोडवण्यासाठी ठेकेदार व संबंधित प्रशासकीय अधिकारी यांना योग्य त्या सूचना द्याव्यात. असं साकडं परिसरातील नागरिक व खुटबाव ग्रामस्थांनी थोरात यांना घातलं आहे.