जागेचे बनावट कागदपत्र प्रकरण : इंतु, अकबर शेख यांना सशर्त अंतरिम जामीन तर अन्य दोघांचा जामीन फेटाळला
पुणे, दि. २ मार्च, महाराष्ट्र मिरर :
जागेचे बनावट कागदपत्र तयार करून जागा बळकावल्याप्रकरणी दाखल गुन्ह्यात इंतु, अकबर शेख यांना न्यायालयाने सशर्त जामीन मंजूर केला आहे. तर दुसरीकडे बक्षु भाई व इम्रान कट्टा यांचा जामीन अर्ज न्यायालयाकडून फेटाळण्यात आला आहे. इम्तियाज (इंतु) व अकबर शेख यांच्या कडून पुण्यातील प्रसिद्ध वकील ऍड. बिलाल शेख यांचा युक्तिवाद न्यायालयाने ग्राह्य धरून ११ मार्च पर्यंत दोघांना सशर्त जामीन मंजूर केला आहे.
जागा मालक विना संघवी यांच्या तर्फे फिर्यादी विजय संघवी यांनी राज गुलाब शेख, बक्षु भाई, इंतु, अकबरभाई, इम्रान कट्टा व इतर यांच्या विरुद्ध बनावट दस्तऐवज तयार केल्याप्रकरणी तक्रार दिल्याने वानवडी पोलीस ठाण्यात गुरन. १६२/२०२४ भादंवि १२० ब, ३४, ४०६, ४२०, ४६७, ४६८, ४७१, ४५२, ५०६ अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला होता.
यावेळी इम्तियाज (इंतु) व अकबर शेख यांच्यावतीने ऍड. बिलाल शेख यांनी अंतरिम जमीन मिळण्यासाठी न्यायालयात धाव घेतली होती. यावेळी अतिरिक्त सत्र न्यायाधीश ए. एन. मरे यांच्या समोर ऍड बिलाल शेख यांनी इम्तियाज (इंतु) व अकबर शेख यांच्याकडून युक्तिवाद केला. त्यास न्यायाधीश ए. एन. मरे यांनी ग्राह्य मानत सशर्त जामीन मंजूर केला. यावेळी ३० हजार रुपयांचा वैयक्तिक जातमुचलका, साक्षीदार यांच्याशी संवाद न साधने, तपास अधिकारी यांना सहकार्य करणे, वैयक्तिक रहिवास, संपर्क यांची माहिती तपास अधिकारी यांना पुरविणे व इतर अशा अटी लादल्या आहेत. सदर अंतरिम जामीन ११ मार्च सुनावणी पर्यंत देण्यात आले आहे.
तर दुसरीकडे तपास अधिकारी यांनी घेतलेल्या हरकतीमुळे बक्षु भाई व इम्रान कट्टा यांचा जामीन कोर्टाने फेटाळला आहे.