Virar Gang Rape Case : सामूहिक बलात्कारातील फरार आरोपीला पोलिसांनी 24 वर्षानंतर ठोकल्या बेड्या
Virar Crime Branch Arrested Gang Rape Accused: विरार गुन्हे प्रकटीकरण विभागाची कारवाई ; बलात्कार प्रकरणातील सहा आरोपींपैकी एक आरोपी 24 वर्षांपासून पोलिसांना देत होता गुंगारा
विरार :- 21 मे 2001 रोजी पीडित तरुणी चुलत भावाच्या लग्नाला कोळोशी तालुका वसई येथे आले असता पहाटेच्या सुमारास आरोपींनी महिलेला घराच्या बाजूला शेतात घेऊन जाऊन तिच्यावर सामूहिक बलात्कार केला होता. या बलात्कारासंदर्भातील विरार पोलीस ठाणे Virar Police Station येथे भादवी कलम 376 (2),323,34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. विरार पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण विभागाने कारवाई करत 24 वर्षांपासून फरार असलेल्या बलात्कारी आरोपीला पोलिसांनी आता जेरबंद केले आहे. यापूर्वीच पोलिसांनी या बलात्कारातील पाच आरोपींना अटक केली होती. Virar Latest Crime News
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विरार पोलीस ठाण्यात कलम 376 आरोपी मागील 24 वर्षांपासून फरार होता. चुलत भावाच्या लग्नाला आलेल्या एका पीडित तरुणी वर सामूहिक बलात्कार करण्यात आला होता. या बलात्कारात प्रकरणात पोलिसांनी यापूर्वीच पाच आरोपींना अटक केले होते. परंतु सहावा आरोपी शांताराम विणा (इनु) बरटा (49 वर्ष,रा. वसई) हा फरार होता. विरार पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाच्या पोलिसांना फरार आरोपी आपल्या नातेवाईकांना भेटण्याकरिता अधुन मधून गावात येत असल्याचे पोलिसांना माहिती मिळाली होती. पोलिसांनी बारकाईने चौकशी करून आरोपीला सापळा रचून अटक केले. अटक आरोपीची उलट तपासणी केली असता त्याने 24 वर्षांपूर्वी केलेल्या कृत्य मान्य केले. तसेच तो स्वतःचे अस्तित्व लपून मागील 24 वर्षांपासून राहत असल्याचे पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाले. सर्व आरोपींना अटक केली असून लवकरच न्यायालयासमोर हजर करुन बलात्काराचे प्रकरण पुन्हा एकदा सुरू करणार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. Virar Latest Crime News
पोलीस पथक
जयंत भजबळे, पोलीस उप-आयुक्त, परिमंडळ-3, बजरंग देसाई, सहाय्यक पोलीस आयुक्त, विरार विभाग, विजय पवार, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, सुशीलकुमार शिंदे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश फडतरे, पोलीस उपनिरीक्षक अविनाश हाटखिळे, पोलीस उपनिरीक्षक भाऊ डुबे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक विजय सूर्यवंशी, पोलीस हवालदार सचिन लोखंडे, संदिप जाधव, विशाल लोहार, इंद्रनिल पाटील तसेच पोलीस अंमलदार संदिप शेळके, मोहसीन दिवाण, सचिन बळीद, बालाजी गायकवाड, रोशन पुरकर, प्रफुल सोनार यांनी सदरची कामगिरी यशस्वीरित्या पार पाडली आहे. Virar Latest Crime News