Bhayandar Crime News : गुन्हे शाखा प्रकटीकरण विभागाची कामगिरी ; सराईत तडीपार गुन्हेगाराला जेरबंद
•तडीपार, फसवणूक, महिला अत्याचार यांसारख्या गंभीर गुन्हे दाखल असलेल्या सराईत गुन्हेगाराला गुन्हे शाखेने अटक केली
भाईंदर :- शिवप्रसाद कुणाल शेट्टी (34 वर्ष, कस्तुरी इस्टेट, भाईदर पूर्व) फसवणूक, महिलावर अत्याचार, तडीपार असे गंभीर गुन्हे दाखल असलेल्या आरोपीला गुन्हे प्रकटीकरण विभागाने अटक केली आहे. आरोपीवर नवघर पोलीस ठाण्यात 3, मिरा रोड पोलीस ठाण्यात 3, उत्तन पोलीस ठाण्यात 1, नया नगर पोलीस ठाण्यात 1 असे एकूण 8 गुन्हे न्यायप्रविष्ठ आहे. पोलिसांनी आरोपीचे कृत्य पाहून त्यांनी केलेल्या गुन्हयामुळे समाजामध्ये निर्माण झालेल्या भयमुळे आणि गुन्हेगारी प्रवृत्तीमुळे आरोपीला 9 एप्रिल 2024 रोजी कलम 56 (1),(अ),(ब) प्रमाणे दोन वर्षाच्या कालावधी करिता ठाणे, पालघर, मुंबई शहर, मुंबई उपनगर या जिल्ह्यातून हद्दपार केले होते.
आरोपी शिवप्रसाद कुशाल शेट्टी याला तडीपार करण्यात आले होते परंतु आरोपी हा तडीपार असूनही फरार होता आणि शहरात वावर करत असे. त्यामुळे पोलीस उप आयुक्त अविनाश अंबुरे यांनी कार्यक्षेत्रातील गंभीर गुन्ह्यातील मुख्य आणि फरार आरोपीला शोधण्याचे आदेश काढले होते. सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन बेंद्रे, पोलीस हवालदार अजीज आसिफ मुल्ला, अनिल रामदास नागरे असे गुन्हेगार वॉच पेट्रोलिंग फिरत असताना शिवराज, चेंबरमधील सिल्वर क्लुड हॉटेल गेट बाहेर उभा असल्याचे पोलिसांना दिसून आले. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. ठाणे जिल्ह्यातून हद्दपार असतानाही कोणतीही परवानगी न घेता आल्याने त्याच्याविरुद्ध नवघर पोलीस ठाण्यात महाराष्ट्र पोलीस अधिनियमन कलम 142 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याच्यावर पुढील कारवाई करण्यात येत आहे.
पोलीस पथक
पोलीस उप आयुक्त (गुन्हे) अविनाश अंबुरे, सहाय्यक पोलीस आयुक्त (गुन्हे) मदन बल्लाळ यांचे मार्गदर्शनाखाली मध्यवर्ती गुन्हे प्रकटीकरण शाखेचे प्रभारी पोलीस निरीक्षक राहुल राख, पोलीस निरीक्षक धनंजय पोरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय सरक, सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन बेन्द्रे, पोलीस उपनिरीक्षक हितेंन्द्र विचारे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक श्रीमंत जेधे, मनोहर तावरे, पोलीस हवालदार अनिल नांगरे, आसीफ मुल्ला, हनुमंत सुर्यवंशी, संग्राम गायकवाड, राजविर संधु, प्रविणराज पवार, सतिष जगताप, राजाराम काळे, महेश वेल्हे, शिवाजी पाटील, गोविंद केंद्रे, संतोष मदने, पोशि.अंकीत सुतार, नितीन राठोड, साकेत माघाडे, अंगद मुळे, मसुब सचीन चौधरी सर्व नेमणुक मध्यवर्ती गुन्हे प्रकटीकरण शाखा यांनी यशस्वी कामगिरी केली आहे.