Raj Thackeray : महाराष्ट्र नवनिर्माण सेना प्रमुख राज ठाकरे यांचा शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप
•मनोज जरांगे पाटील यांच्या पाठवून शरद पवार आणि उद्धव ठाकरे राजकारण करत असल्याचा गंभीर आरोप राज ठाकरे यांनी केला आहे
छत्रपती संभाजीनगर :- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा जरांगे पाटील सह शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. राज ठाकरे मराठवाड्याच्या दौऱ्यावर असून त्यांचा आज मराठवाड्याचा दौरा सांगता होणार आहे. तत्पूर्वी राज ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यावर गंभीर आरोप केले आहे. राज ठाकरे यांना मराठवाड्याच्या दौऱ्यादरम्यान दोन वेळेस मराठा आंदोलकांना सामोरे जावे लागले. काल संध्याकाळच्या दरम्यान राज ठाकरे यांच्या ताफ्यावर शिवसेना ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी आणि मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी सुपारी आणि टोमॅटो फेकल्याचा गंभीर आरोप राज ठाकरे यांनी केला आहे तर संजय राऊत यांनी ते कार्यकर्ते आमचे नसल्याचे सांगितले आहे.
राज ठाकरे हा छत्रपती संभाजी नगर दौऱ्यावर असताना त्यांनी पत्रकार परिषदेत शरद पवार, उद्धव ठाकरे आणि जरांगे पाटील यांच्यावर निशाणा साधला आहे.मनोज जरांगेंच्या मागून शरद पवार आणि उद्धव ठाकरे राजकारण करत आहे. काही पत्रकार हे सुद्धा राजकारण करत आहेत. त्यापैकी कुणाला कंत्राट मिळाले, तर कुणी गाड्या घेतल्या. कुणाला भुखंड मिळाला, हे सर्व मला माहिती आहे. त्यांची माहिती मी देणार असून त्यांची लवकरच चौकशी लावली जाईल, असे ते म्हणाले. माझ्या नादी लागू नका. माझी पोरं काय करतील हे सांगता येत नाही. उद्या माझे मोहोळ उठले तर एकही सभा घेता येणार नाही. त्यामुळे माझ्या वाट्याला जाऊ नका. तुमच्याकडे प्रस्थापित आहेत माझ्याकडे विस्थापीत आहेत, असेही राज ठाकरे यावेळी उद्धव ठाकरे व शरद पवार यांना इशारा देताना म्हणाले.
राज ठाकरे म्हणाले की, संजय राऊत हे शरद पवारांची सोंगटी आणि करवली आहे, अशी टीका त्यांनी केली आहे. तर पवारांच्या उंबरठ्यसावर बसून ते आपले संपूर्ण आयुष्य झिजवणार आहेत. अजित पवार कधीच जातीय राजकारणात पडले नाही, असेही राज ठाकरेंनी म्हटले आहे
राज ठाकरे म्हणाले की, आपले सरकार तरुणांना योग्य माहिती देत नाही. राज्यात 60 टक्क्यांवर रिक्षाचालक इतर राज्यातील आहेत. जर तो रोजगार आपल्या मुलांना मिळाला असता तर 1 कोटी मुलांना रोजगार मिळाला असता, असे ठाकरेंनी म्हटले आहे.
राज ठाकरे म्हणाले की, 2006 सालापासून आजपर्यंत माझी एकच भूमिका आहे, आर्थिक बाबीवर आरक्षण द्यायला हवे अशी माझी भूमिका आहे. यानंतर माझी भूमिका आहे की जर महाराष्ट्रात जर पहिला विचार महाराष्र्टातील मुलांचा झाला तर आरक्षणाची गरज पडणार नाही. आर्थिक दृष्टीने जो मागास आहे त्याला आरक्षण द्यायला हवे.
दिवाळीनंतर विधानसभेच्या निवडणुका होतील असे आज तरी वाटत आहे. या दृष्टीने हा दौरा सुरू आहे. 30 तारखेला माझा विदर्भ दौरा सुरू होणार आहे. मी दौरा आटोपता घेतला नाही केवळ मी जे मुक्काम करणार होतो ते केले नाही, यामुळे दौरा लवकर पूर्ण झाला, असे मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी म्हटले आहे.
राज ठाकरे म्हणाले की, लोकसभा निवडणुकीत भाजपच्या विरोधात मतदान झाले. ते शरद पवार आणि उद्धव् ठाकरे यांच्या प्रेमाखातर त्यांच्या पक्षांना मतदान झाले नाही. शरद पवार यांनी राज्यात जातीचे राजकारण राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापणेपासून सुरू केले.