कल्याण : आजीच्या पेन्शनवरुन बँकेत कुटुंब भिडले, चाकू हल्ला करुन तीनजण फरार
Kalyan Latest Murder News : आजीच्या पेन्शनवरून कल्याण मध्ये कौटुंबिक वाद बँकेच्या चव्हाट्यावर, दोन कुटुंब आपसात भिडले दोघांवर प्राण घातक हल्ला तिघेजण फरार
कल्याण :- बँक ऑफ बडोदा मध्ये रक्त सांडल्याचे दृश्य पाहायला मिळाले. कारणही तसेच होते आजीच्या पेन्शनवरून नातेवाईक बँकेतच एकमेकांना भिडल्याचा प्रकार कल्याणमध्ये घडला आहे. “Blood on the Bank: Pensioners’ Clash at Bank of Baroda Branch in Kalyan” यावेळी झालेल्या वादातून तिघांनी मिळून एका दुसऱ्या गटातील दोघांवर चाकूने हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. बँक ऑफ बडोद्याच्या कल्याणमधील शाखेत हा गुन्हा घडला आहे. हल्ल्यात दोन जण गंभीर जखमी झाले आहेत, त्यांच्यावर रूग्णालयात उपचार सुरू आहेत. “Bloodshed at Bank of Baroda: Pension Dispute Turns Deadly” दोन्ही गटामध्ये हा संपूर्ण वाद बँकेतच सूरू होता. त्यामुळे बँक कर्मचाऱ्यांनी दोघांना समजावून सांगत, बँकेतून बाहेर केले. मात्र तरी देखील दोघांमधील वाद शमला नाही आणि उलट वाढतच गेला. त्यानंतर चव्हाण गटाने चाकू काढून परमार बंधूंवर सपासप वार करून हल्ला केला. “Pensioners Turned Enemies: Pension Dispute Leads to Knife Attack in Bank” या हल्ल्यात परमार बंधू गंभीररीत्या जखमी झाले होते. या संपूर्ण घटनेनंतर चव्हाण गटाने पळ काढला होता. Kalyan Latest Murder News
बाजारपेठ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी राहुल किसन परमार (26 वर्ष) आणि त्याचा भाऊ विजय हे बँक ऑफ बडोदा कल्याणच्या आग्रा रोड, शाखेच्या बँकेवर आजीच्या पेन्शनचे पैसे काढण्यासाठी आले होते. त्याचवेळी त्यांच्या कुटुंबातील इतर सदस्य हे आजीच्या पेन्शनवर हक्क दाखवण्याकरिता आले होते. याच वादातून नाथा गिगा चव्हाण (48 वर्ष), प्रथम चव्हाण (25 वर्ष) , मयूर शिवदास यांच्यासोबत पेन्शनवरून वाद झाला. त्यावरून या तिन्ही आरोपींनी राहुल परमार आणि विजय परमार यांच्यावर चाकूने हल्ला करत त्यांना जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला आहे. पोलिसांनी बँक ऑफ बडोदा या घटनास्थळी जाऊन पाहणी केली सीसीटीव्ही फुटेज च्या मदतीने आरोपींचा शोध घेत आहे. तसेच पोलिसांनी आरोपींच्या विरोधात भारतीय न्याय संहिता कलम 109,3(5) प्रमाणे बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक लक्ष्मण साबळे हे करत असून फरार आरोपींचा पोलिसांकडून शोध घेत आहे. Kalyan Latest Murder News