Sanjay Kelkar : विरोधीपक्ष विषाप्रमाणे काम करतोय – आमदार संजय केळकर यांचा घणाघात
पनवेल (प्रतिनिधी) : भारतीय जनता पक्ष सत्ता लोकांच्या सेवेसाठी म्हणून बघतो मात्र विरोधक स्वार्थासाठी सत्ता मिळवू पाहत आहे.त्या अनुषंगाने लोकसभा निवडणुकीपासून विरोधकांनी खूप अपप्रचार केला, आणि विष जसे लगेच पसरते त्याप्रमाणे विरोधीपक्ष विषारी काम करत आहेत, अशी घणाघाती टीका ठाण्याचे आमदार संजय केळकर Sanjay Kelkar यांनी येथे केली. भारतीय जनता पार्टी उत्तर रायगड जिल्हा विस्तारित कार्यकारिणी बैठक शहरातील आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात पार पडली. त्यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून ते बोलत होते. Panvel BJP Latest News
यावेळी व्यासपिठावर प्रमुख मान्यवर म्हणून माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी, प्रदेश सरचिटणीस विक्रांत पाटील, प्रदेश उपाध्यक्ष अतुल काळसेकर, प्रदेश सदस्य बाळासाहेब पाटील, कोकण विभाग संघटन मंत्री शैलेंद्र दळवी, उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, जिल्हा सरचिटणीस नितीन पाटील, ऍड.प्रकाश बिनेदार, दीपक बेहेरे, चारुशीला घरत, पनवेल तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत, शहर अध्यक्ष अनिल भगत, अभिजित पेडणेकर, महानगरपालिकेचे माजी सभागृहनेते परेश ठाकूर, उरण तालुकाध्यक्ष रवी भोईर, कामोठे अध्यक्ष रवींद्र जोशी, खारघर अध्यक्ष प्रवीण पाटील, कळंबोली अध्यक्ष रविनाथ पाटील, कर्जत तालुकाध्यक्ष राजेश भगत, खालापूर तालुकाध्यक्ष प्रवीण मोरे, खोपोली अध्यक्ष रमेश रेटरेकर, महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्षा आश्विनी पाटील, कर्जत विधानसभा संयोजक किरण ठाकरे, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष मयुरेश नेतकर आदी उपस्थित होते. या बैठकीला स्थानिक स्वराज्य संस्थेचे लोकप्रतिनिधी, जिल्हा कार्यकारिणी पदाधिकारी, विविध सेल मोर्चाचे पदाधिकारी उपस्थित होते. Panvel BJP Latest News
आमदार संजय केळकर यांनी पुढे बोलताना म्हंटले कि, मोदीजी पंतप्रधान झाल्यापासून आपण जगात एक नंबरवर आहोत. आपल्या देशाचा सर्वांगिण विकास होत असताना आजूबाजूच्या राष्ट्रांनाही मोदीजींनी ताकद दिली आहे. काँग्रेसने त्यांच्या सत्ताकाळात काश्मिर ते कन्याकुमारीपर्यंत घोटाळे केले. मात्र आता सत्ता हाती लागत नाही हे पाहून समाजामध्ये तेढ करणारे वातावरण निर्माण करण्यात आले आणि जातीपातीचे राजकारण करून बेदाग मोदी सरकाराला बदनाम करण्याचा षडयंत्र रचला गेला. महिलांच्या सन्मानार्थ योजना राज्य सरकारच्या माध्यमातून अंमलात आणल्या आहे मात्र विरोधकांकडून त्या योजनांच्या बाबतीतही अपप्रचार करण्याचा डाव सुरु झाला आहे. त्यामुळे विरोधकांनाही रडीचा डाव बंद करावा, अशा शब्दात आ. केळकर यांनी खडेबोल सुनावले. एकेकाळी सरपंच झाला तरी आम्ही आनंदाने उडी मारून स्वागत करायचो. लोकसभेत पनवेलने मतांची मोठी आघाडी मिळवून दिली आहे. त्यामुळे पक्षाला अनुकूल वातावरण निर्माण झाले असून आता हा रायगड जिल्हा पूर्णपणे भाजपमय झाला आहे. त्यामुळे उत्तर रायगड जिल्ह्यात सर्व जागा जिंकू असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. ‘प्रथम राष्ट्र, नंतर पक्ष त्यानंतर स्वतः’ हि महत्वाची निष्ठा पक्षाने कधीही बदलली नाही. अंत्योदयाचा विचार पक्षाचा मूळ आधार असून कार्यकर्ता हि भाजपची संपत्ती आहे. ३० वर्षांपूर्वी काँग्रेसने लोकसभेच्या २४० जागा जिंकल्या त्यानंतर कधीही काँग्रेसला जागा जिंकता आल्या नाहीत नापास होऊनही आपण पास झालो आहोत असा अभिर्भाव काँग्रेसकडून केला जात आहे. सकाळी एक जण उठून फक्त टीव्हीमध्ये येतो आणि नुसताच हमरी तुमरीवर येतो एक तर मी राहीन नाही तर तू राहीन अशी भाषा महापुरुष संतांच्या भूमीत करत असल्याचे सांगत उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री म्हणून कामे केली नाहीत पण प्रकल्पांना स्थगिती देण्याचे काम मात्र चोख केले. Panvel BJP Latest News