Share Market Fraud Pune | शेयर मार्केटच्या नावाखाली पुणेकरांना २६ कोटींचा चूना : मुंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
- Share Market Fraud Pune | महिना ५% परताव्याचे आमिष दाखवत केली फसवणूक
पुणे, दि. ३ ऑगस्ट, मुबारक जिनेरी (महाराष्ट्र मिरर) Share Market Fraud Pune
शेयर मार्केट मध्ये पैसे गुंतवणूक केल्यास दरमहा ५% परतावा देण्याचे आमिष दाखवून एका कंपनीने पुणेकरांना तब्बल २६ कोटी ४१ लाख रुपयांचा चुना लावला आहे. मुंढवा (mundhwa police station) पोलीस ठाण्यात कंपनी मालकासह ७ जणांवर गुन्हा दाखल झाल्याने पुण्यात खळबळ उडाली आहे.
याबाबत एका ठेवीदाराने तक्रार दिल्यावरून मुंढवा पोलीस ठाण्यात आरोपी सुरेश गाडीवडार व इतर ७ विरुद्ध गुरन.३२५/२०२४ भादंवि कलम ४०६, ४२०, ३४, महाराष्ट्र ठेवीदारांच्या (वित्तीयसंस्थांमधील) हित संबंधाचे संरक्षण अधिनियम १९९९ चे कलम ३,४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. Pune Police
सन २०२०-२०२४ दरम्यान नामांकित कंपनीमध्ये गुंतवणूक केल्यास ५% दरमहा परतावा देण्याचे आमिष एस जी इंस्व्हेस्टमेन्ट कंपनीकडून ठेवीदारांना देण्यात आले होते. यावेळी परतावा न दिल्याने फसवणूक झाल्याचे लक्षात येताच ठेवीदारांनी पोलिसांकडे धाव घेतली.
गुन्ह्याचा अधिक तपास मुंढवा पोलीस ठाणे गुन्हे निरीक्षक बाबासाहेब निकम करत आहेत.