क्राईम न्यूजठाणे

Badlapur Crime News : बदलापूरमध्ये राजेश वॉच शॉपवर दरोडा

Badlapur Crime News : बदलापूर मध्ये घड्याळाच्या दुकानात चोरी, 23 लाखाचे घड्याळ चोरट्याने केले लंपास

बदलापूर :- सिटीप्राईड‌ घोरपडे चौक येथे Citypride Chowk असलेल्या राजेश वॉच शॉप या घड्याळाच्या दुकानावर अज्ञात चोरट्याने दरोडा टाकत तब्बल 23 लाख रुपयाचे हातातले घड्याळ लंपास केले आहे. बुधवारी पहाटेच्या दरम्यान ही चोरी झाल्याचे दुकानाच्या मालकाने सांगितले आहे. Badlapur Crime News

“राजेश वॉच शॉप” चे मालक Rajesh Watch Shop राजेश श्रीचंद चावला (42 वर्ष) यांचे सिटी प्राईड घोरपडे चौक बदलापूर पूर्व येथे असलेल्या घड्याळाच्या दुकानात अज्ञात चोरट्याने चोरी केल्याची तक्रार बदलापूर पूर्व पोलीस ठाण्यात देण्यात आली आहे. या चोरीमध्ये चोरट्यांनी जवळपास 23 लाख रुपयाचे हातातले वेगवेगळ्या कंपनीचे महागडे घड्याळ चोरून नेल्याची तक्रार त्यांनी दिली आहे. जवळपास सात अज्ञात व्यक्तींनी हा दरोडा घातल्याचे सीसीटीव्ही फुटेज मध्ये दिसत आहे. राजेश यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी Badlapur Police Station अज्ञात आरोपींच्या विरोधात भारतीय न्याय संहिता कलम 305, 331(3), 331(4),3(5) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हयाचा तपास पोलीस उपनिरीक्षक थिटे हे करत आहे. Badlapur Crime News

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0