Dombivli Cirme News : मानपाडा पोलिसांची मोठी कामगिरी; 7 लाख 58 हजार 190 रुपये किमतीचा गुटखा जप्त
Manpada Police Caught Tobacco Car And Arrested Criminal – कार मधून सुगंधी तंबाखू ,पानमसाला, सुपारी जर्दा, पोलिसांनी केलं जप्त
डोंबिवली :- महाराष्ट्र राज्यात गुटखा बंदी असताना अन्नसुरक्षा मानके गुन्हे शाखा 3 कल्याण यांना मिळालेल्या गोपनीय माहितीवरून खोणी फाटा डोंबिवली पूर्व भागातील निसर्ग हॉटेल जवळ मारुती सुझुकी कार येणार असल्याचे पोलिसांना माहिती मिळाली. Dombivli Cirme News
मानपाडा पोलिसांनी Manpada Police News छापा टाकत कारची पाहणी केली असता त्यामध्ये तंबाखूजन्य पदार्थ असल्याचे पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाले ज्याची किंमत 7 लाख 58 हजार 190 रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले असून हा माल बेकायदेशीर रित्या विक्रीसाठी आल्याचे पोलिसांनी सांगितले पोलिसांनी सरकार तर्फे दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी विरोधात भा.द.वि.कलम 328,188,273 सह अन्न सुरक्षा व मानके कायदा 2006 कलम 26(2)(i), 26(2)(iv), 27(1), 3(1)(zz)(i), 30(2)(अे) सह शिक्षा कलम 59(3) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्या ठिकाणी आरोपी क्र.1) विराज सिताराम आलीमकर, (24 वर्षे) 2) मोहम्मद उमर अब्दुल रेकमान, (35 वर्षे) 3) मोहम्मद तारीक अलीकदर खान, (21 वर्षे)
आरोपींना अटक करण्यात आली आहे. गुन्हयाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक उगलमुगले हे करीत आहे. Dombivli Cirme News