मुंबई
Trending
गगनयान मिशन: भारताचे हे चार अंतराळवीर जातील अंतराळात, पंतप्रधान मोदींनी केली नावे जाहीर
•चंद्र आणि सूर्यानंतर भारत पुन्हा एकदा अवकाशात आपले वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी सज्ज झाला आहे. भारताची पहिली मानवी अंतराळ मोहीम लवकरच प्रक्षेपित होणार आहे.
ANI :- इस्रोच्या गगनयान मोहिमेसाठी अंतराळात जाणाऱ्या चार अंतराळवीरांची नावे समोर आली आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांची नावे जाहीर केली आहेत. तत्पूर्वी, त्यांनी गगनयान मोहिमेच्या प्रगतीचा आढावा घेतला आणि नामांकित अंतराळवीरांची भेट घेतली आणि शुभेच्छा दिल्या. Gaganyaan Mission Astronauts
पीएम मोदींनी जाहीर केलेल्या नावांमध्ये फायटर पायलट प्रशांत बालकृष्णन नायर, अंगद प्रताप, अजित कृष्णन आणि शुभांशू शुक्ला यांचा समावेश आहे. त्यापैकी प्रशांत हा मूळचा केरळमधील पलक्कड येथील नेनमारा येथील रहिवासी असून तो हवाई दलात ग्रुप कॅप्टन म्हणून कार्यरत आहे. Gaganyaan Mission Astronauts