क्राईम न्यूजमुंबई

Nalasopara Crime News : कॉपर वायर कंपनीवर दरोडा, 28 लाखाचा मुद्देमाल लंपास

Nalasopara Crime News : गुन्हे शाखा कक्ष -, विरार यांची कारवाई कंपनीवर दरोडा टाकणाऱ्या टोळीला पोलिसांनी केले अटक, अनेक पोलीस ठाण्यात आरोपींच्या विरोधात गुन्हे दाखल

नालासोपारा :- नेमिकाब केबल इंडस्ट्रियल ( रिचर्ड कंपाऊंड, मनिचापाडा नालासोपारा पूर्व ) येथे दोन वॉचमनला‌ सात ते आठ जणांनी मारहाण करून त्यांच्या हातपाय बांधून ठेवले होते. सात ते आठ जण तोंडाला रुमाल बांधून येऊन वॉचमनला शिवीगाळ केली तसेच कंपनीचे शटर तोडून आत मधील 29 लाख किमतीचे तयार व र कॉपर मटेरियल बंडल पळून टेम्पो मध्ये भरून लंपास केले. या संदर्भात घडलेल्या प्रकरणाबाबत दोन वॉचमन साक्षीदार यांनी कंपनीच्या मालकासह पेल्हार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. भारतीय न्याय संहिता कलम 310 (2),127 (2),352,115 (2) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Nalasopara Crime News : Robbery on copper wire company, 28 lakh worth of goods looted

औद्योगिक वसाहती मधील कंपनीमध्ये टाकलेल्या दरोड्याबाबत गंभीरता लक्षात घेऊन पोलीस उप आयुक्त गुन्हे आणि सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे यांनी दिलेला सूचनेवरून तपासाच्या घटनास्थळी उपलब्ध असलेल्या सीसीटीव्ही फुटेज तसेच संशयित आरोपीचा शोध घेण्यास पोलिसांनी सुरुवात केली. पोलिसांनी सीसीटीव्ही आणि गोपनीय माहितीच्या आधारे आठ आरोपींना मुंबईच्या वेगवेगळ्या भागातून अटक करण्यात आली आहे. आठही आरोपी सराईत गुन्हेगार असून, यांच्या विरोधात विविध पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहे. Nalasopara Crime News

आरोपींची नावे

1) रियाजुल रेहमान शेख (37 वर्ष), रा. मलाड पश्चिम
2) ईशान अब्दुल रेहमान शेख (41 वर्ष) रा., गोरेगाव पश्चिम, मुंबई.
3) राजु प्रसाद रामखिलावण विश्वकर्मा (36 वर्ष), रा. भिवंडी, ता. कल्याण, जि. ठाणे.
4) विजय किसन वाख (39 वर्ष), रा. ता. शहापुर, जि. ठाणे.
5) कुणाल ऊर्फ शिवराम सोमा खडके (34 वर्ष), रा. ता. शहापूर, जि. ठाणे.
6) कुणाल सुनिल जाधव (30 वर्ष), रा. बदलापूर, ता. अंबरनाथ, जि. ठाणे 7) सद्दाम रहिस मनिहार (30 वर्ष), रा. बदलापूर, जि. ठाणे
8) सलिम फत्ते मोहम्मद अंन्सारी वय (40 वर्ष), रा. गोवंडी, चेंबुर मुंबई. यांना 06 जुलै 2024 रोजी ताब्यात घेण्यात आले आहे.ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपी यांचा गुन्हेगारी पुर्वाभिलेख पडताळून पाहता त्यांचेवर, खुन, दरोडा सारखे गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहे. आरोपी सलिम फत्ते मोहम्मद अंन्सारी ऊर्फ हकला याच्या विरोधात चार पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहे.ईशान अब्दुल रेहमान शेख,राजु प्रसाद रामखिलावण विश्वकर्मा,विजय किसन वाख,कुणाल ऊर्फ शिवराम मोसा खडके या सर्व आरोपींच्या विरोधात वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात प्रत्येकी एक एक गुन्हा दाखल आहे. Nalasopara Crime News

नमुद आरोपीत याचे कडून हस्तगत मुद्देमाल

1) 28 लाख रुपये किंमतीचा रों कॉपर बंडल व तयार कॉपर केबलचे बंडल

2 ) 25 लाख रुपये किंमतीची टाटा कंपनीचा ट्रक.

3) 5 लाख रुपये किमतीची मारुती वेंगन आर कार

4) 50 हजार रुपये किंमतीची यूनिकॉन बाईक

5) 1 लाख 59 हजार रुपये किमतीचे मोबाईल फोन

60 लाख 09 हजार रुपये एकुण मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.

पोलीस पथक
मधुकर पाण्डेय, पोलीस आयुक्त, श्रीकांत पाठक, अपर पोलीस आयुक्त,अविनाश अंबुरे, पोलीस उप आयुक्त, (गुन्हे), मदन बल्लाळ सहा. पोलीस आयुक्त सहाय्यक (गुन्हे) मीरा-भाईंदर वसई विरारपोलीस आयुक्तालय यांच्या मार्गदर्शनाखाली, निरीक्षक प्रमोद बडाख, पोलीस उपनिरीक्षक उमेश भागवत, पोलीस हवालदार अशोक पाटील, मनोज चव्हाण, सचिन घेरे, मुकेश तटकरे, सागर बारवकर, अश्विन पाटील, पोलीस अंमलदार राकेश पवार, सुनिल पाटील, युवराज वाघमोडे, सुमित जाधव, मनोज तारडे, तुषार दळवी, आतिश पवार, प्रविण वानखेडे, गणेश यादव, सागर सोनवणे सर्व नेमणुक गुन्हे शाखा कक्ष-3 तसेच सहाय्यक फौजदार संतोष चव्हाण नेम सायबर सेल यांनी सराईत गुन्हेगार असलेल्या टोळीला अटक केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0