Vijay Lokhande : उद्योजक विजय लोखंडे यांच्या व्यावसायिक भागीदाराचा मुलगा झाला लंडनमध्ये खासदार
पनवेल – पनवेल औद्योगिक वसाहतीचे अध्यक्ष,उद्योजक विजय लोखंडे Vijay Lokhande यांचे व्यावसायिक भागीदार व अनिवासीय भारतीय उद्योजक हरभजनसिंग संधेर Harbajan Singh Sindher यांचा मुलगा लंडनमध्ये खासदार झाल्याने पनवेल औद्योगिक वसाहतीमध्ये आनंदाचे वातावरण आहे. Panvel Latest News
उद्योजक हरभजनसिंग संधेर हे पनवेल औद्योगिक वसाहतीचे सदस्य आहेत.नुकत्याच लंडनमध्ये ( ब्रिटन) संसदीय निवडणुका झाल्या,त्यात उद्योजक हरभजनसिंग संधेर यांचा धाकटा मुलगा जीवन संधेर हा लेबर पार्टीतर्फे लॉफबरो येथून निवडून आला आहे.तो पहिल्यांदाच निवडणुकीसाठी उभा राहिला आणि निवडूनही आला.पनवेल औद्योगिक वसाहतीसाठी ही अभिमानाची गोष्ट आहे.जीवन संधेर हा खासदार म्हणून निवडून आल्याबद्दल पनवेल औद्योगिक वसाहतीचे अध्यक्ष विजय लोखंडे यांनी खास अभिनंदन करून त्याला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.व्यवसायानिमित्त पनवेल औद्योगिक वसाहत आणि लंडन असं उद्योगाच एक नातं तयार झाले आहे.जीवन संधेर हा तरुण असून अगदी कमी वयात निवडून आला आहे,यापूर्वी तो लंडन येथील शासकीय सेवेत काम करीत होता.तो खासदार झाल्याने पनवेल औद्योगिक वसाहतीमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
Vijay Lokhande: The son of businessman Vijay Lokhande’s business partner became an MP in London