Virar Crime News : सोनसाखळी चोरी करणाऱ्या सराईत आरोपीना अटक
Virar Police Arrested Criminal – विरार पोलीस ठाणेचे गुन्हे प्रकटीकरण शाखेस यश
विरार :- पोलीस ठाणे हद्दीत (21 फेब्रुवारी) रोजी 9.00 वा. चे सुमारास मनवेलपाडा सिग्नल जवळ, निदान लॅब समोर, विरार-नालासोपारा लिंक रोड, विरार येथे तक्रारदार हे पायी चालत जात असतांना, निदान लॅब समोर आले असता, एका अनोळखी इसमाने धक्का देवुन, तक्रारदार यांस “धक्का मारके उपरसे सॉरी नही बोला”, असे बोलून, कॉलर पकडून धक्का-बुक्की करुन गळ्यातील सोन्याची चैन जबरीने हिसकावुन घेवुन, त्याचे जवळ आलेल्या एका सफेद रंगाच्या स्कुटीवर बसुन पळून गेले बाबत तक्रारदार वासुदेव म्हात्रे (64 वर्षे) , विरार यांचे तक्रारीवरुन विरार पो. ठाणे, भा.दं. वि.सं. कलम-397, 34 प्रमाणे 22 फेब्रुवारी रोजी गुन्हा नोंद केला आहे. Virar Crime News
गुन्हयाचे गांभिर्य लक्षात घेवुन, वरिष्ठांनी दिलेल्या सुचनांनुसार विरार गुन्हे प्रकटीकरण शाखेचे अधिकारी व अंमलदार यांनी लागलीच घटनास्थळी भेट देवून, घटनास्थळी मिळालेल्या सी.सी.टी.व्ही. फुटेज व आरोपीताची एम.ओ.बी. याचे आधारे सदरचा गुन्हा हा आरोपी अज्जु ऊर्फ अजगर खान, भिवंडी यानेच केला असल्याचे निष्पन्न झाल्याने, आरोपीचा भिवंडी परिसरात गुप्त बातमीदार व तांत्रिक माहितीचे आधारे शोध घेत असतांना, सदरचा आरोपीत हा भिवंडी-वाडा रोडवरील यशवंत ढाबा येथे येणार असल्याची खात्रीशिर बातमी मिळाल्याने, लागलीच सदर ठिकाणी सापळा रचून, शिताफतीने सराईत आरोपी नामे. 1) अज्जु ऊर्फ अजगर खान, (43 वर्षे), 2) मिराज अहमद अन्सारी, (33 वर्षे), 3) जमाल अन्सारी, (38 वर्षे) सर्व राहणारे भिवंडी, जि.ठाणे यांना 24 तासात ताब्यात घेवुन, प्रस्तुत गुन्हयात 23 फेब्रुवारी 2024 रोजी अटक करण्यात आली आहे. आरोपीतांचे चौकशी दरम्यान त्यांचेकडून एकुण-20 ग्रॅम सोन्याचे चेन, असा एकुण 1 लाख 10 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करुन, सदरचा गुन्हा उघडकीस आला आहे. Virar Crime News
नमूद सराईत आरोपी नामे
अज्जु ऊर्फ अजगर खान, (43 वर्षे), ठाणे जिल्ह्याच्या विविध पोलीस ठाण्यात तसेच विरार वसई पोलीस ठाण्यातही एकूण 09 गुन्हे दाखल असल्याचे पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाले आहे.
पोलीस पथक
सुहास बावचे, पोलीस उप आयुक्त, परिमंडळ-3, विरार, रामचंद्र देशमुख, सहायक पोलीस आयुक्त, विरार विभाग, यांचे मार्गदर्शनाखाली विरार पोलीस ठाणेचे विजय पवार, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, सुशिलकुमार शिंदे, पोलीस निरीक्षक (गुन्हे), व गुन्हे प्रकटीकरण पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश फडतरे, पोलीस उपनिरीक्षक अविनाश हाटखिळे, पोलीस हवालदार सचिन लोखंडे, संदिप जाधव, विशाल लोहार, इंद्रनिल पाटील, संदिप शेरमाळे, संदिप शेळके, मोहसिन दिवान, सचिन बळीद, बालाजी गायकवाड, रोशन पुरकर, दत्तात्रय जाधव, प्रफुल सोनार, तसेच पोलीस उप आयुक्त, परिमंडळ-3, कार्यालयाचे पोलीस हवालदार नामदेव ढोणे, व पोलीस अंमलदार संतोष खेमनर, यांनी यशस्वीरित्या पार पाडलेली आहे.