Uncategorized

Udhhav Thackeray : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे पंचतारांकित शेतकरी आहे…हेलिकॅप्टरने शेती करणारा एकमेव शेतकरी…; उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray On CM Eknath Shinde : चंद्रकांत दादा पाटील मला चॉकलेट दिले त्याचप्रमाणे मुलींच्या शिक्षणाबाबतही चंद्रकांत दादांनी चॉकलेट दिले का असा सवाल उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला आहे

मुंबई :- पावसाळी अधिवेशनाच्या Maharashtra Monsoon दरम्यान शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे Udhhav Thackeray यांनी पत्रकार परिषद घेतली या पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे यांनी सरकारवर टीका केली आहे. सरकार जनतेला बाय बाय सरकार म्हणत आहे या सरकारच्या निरोपाच्या अधिवेशन असल्याची घोषणा उद्धव ठाकरे यांनी केली. केंद्रात आणि प्रत्येक राज्यात अर्थसंकल्प मांडला जातो. त्या अनुषंगाने ज्या योजना किंवा घोषणा असतील त्याची आर्थिक तरतूद केली जाते उद्या घोषणाचा पाऊस पडेल पण तो गाजर संकल्प असणारा अशी भोसरी ठिकाण उद्धव ठाकरे यांनी केली आहे. उद्धव ठाकरे यांनी चंद्रकांत दादा यांनाही टोला लगावला आहे ते म्हणाले चंद्रकांत दादांनी मला आता चॉकलेट दिले त्याचप्रमाणे मुलींच्या शिक्षणाबाबतही चंद्रकांत दादांनी चॉकलेट दिले का असा प्रश्न उपस्थित केला आहे. अनेक योजना बाबत उद्धव ठाकरे यांनी पत्रकारांशी संवाद केला तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे पंचतारांकित शेती करतात तसेच हेलिकॉप्टर मधून येणारा शेतकरी असा उल्लेख करत उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरही निशाणा साधला आहे. Maharashtra Monsoon Session Latest Update

उद्धव ठाकरे म्हणाले की, घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले होते की एकही शेतकरी आत्महत्या करणार नाही. घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांनी शपथ घेतली तेव्हाच हे जाहीर केले होते. पण शेतकरी आत्महत्या करत आहेत. घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांचे ठीक आहे कारण त्यांची शेती पंचतारांकित आहे. हेलिकॉप्टरने जाणारे ते एकमेव शेतकरी आहेत. अमावस्या, पौर्णिमेला वेगळे पीक मुख्यमंत्री काढतात असेही कळले आहे. असा टोला उद्धव ठाकरेंनी लगावला. Maharashtra Monsoon Session Latest Update

उद्धव ठाकरे म्हणाले की, माझ्या काळात कोरोना होता. पेपर फुटीचा विषय आला तेव्हा आम्ही तो पेपर रद्द करून दुसरा पेपर घेतला. खोटे नरेटिव्ह यालाच म्हणतात असे उद्धव ठाकरे म्हणाले. आम्ही लिफ्टमध्ये होतो. अनेकांना वाटले असेल ना ना करते प्यार तुम्ही से कर बैठे… ती अनौपचारिक भेट झाली. काही चर्चा नाही. भिंतीला कान नसतात. त्यामुळे पुढील चर्चा आम्ही लिफ्टमध्ये करू. Maharashtra Monsoon Session Latest Update

उद्धव ठाकरे म्हणाले की, चंद्रकांतदादांनी मला चॉकलेट दिले. आता लोकांना चॉकलेट देऊ नका. आश्वासनाचे चॉकलेट देऊ नका. कुणीही यावे आणि गाजर दाखवू नका. जनता शहाणी आहे. उद्या काही घोषणा करणार असाल, लाडकी बहीण आणि लाडका भाऊ योजना आणल्यानंतर सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे तिची अंमलबजावणी करायला देऊ नका. त्यांचे चंद्रपुरातील भाषण हिणकस होते, असे ठाकरेंनी म्हटले आहे Maharashtra Monsoon Session Latest Update

उद्धव ठाकरे म्हणाले की, पुणे ड्रग्ज प्रकरणी आम्ही त्यावर आवाज उठवणार आहोत. पण सरकार सत्तेच्या नशेच्या धुंदीत आहे. सरकारला खेचायचे आहे. हे ड्रग्स येतात कुठून? राज्यातील केमिकल्सचे कारखाने हे सोर्स आहेत का? उद्योगमंत्री काय करतात? उद्योगमंत्र्यांचे हे सोर्स आहे का? या गोडाऊनचे इन्स्पेक्शन केले पाहिजे. ड्रग्स प्रकरणावर सर्वांनी एकत्र आले पाहिजे. कुणाचेही सगे सोयरे असू द्या. विरोधकांनी एकत्र आले पाहिजे. आम्ही प्रश्न विचारतोय म्हणून तुमच्या काळात जास्त ड्रग्स सापडले असे फालतू उत्तर नको. त्याच्या मुळाशी जा आणि खणून काढा, असे त्यांनी म्हटले आहे. Maharashtra Monsoon Session Latest Update

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0