महाराष्ट्र

Akshay Mahesh Mhatre : स्थानिक अपक्ष उमेदवार अक्षय महेश म्हात्रे यांना वाढता पाठिंबा

उरण : निवडणुकीला काहीच दिवस बाकी असताना सर्वत्र निवडणुकीचे वारे जोरदार वाहू लागले असतानाच स्थानिक अपक्ष उमेदवार अक्षय महेश म्हात्रे यांनी तळागाळात जाऊन प्रचार केला आणि त्यांना तरुणांपासून ज्येष्ठ नागरिक, शिक्षक, कामगार आणि विद्यार्थ्यांचा तसेच विविध संघटनांचा पाठिंबा मिळत आहे. एवढे मोठे पाऊल उचलताना ज्येष्ठांचा आणि श्रेष्ठांचा आशीर्वाद घ्यावा ही त्यांची धारणा असल्याने त्यांनी थोर समाजसुधारक तसेच ज्येष्ठ निरुपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या चरणी नतमस्तक होऊन त्यांचा आशीर्वाद घेतला व सचिन दादासाहेब धर्माधिकारी यांच्या सानिध्यात राहून जवळपास दीड तास त्यांचे मार्गदर्शन घेतले व ते घेत असताना म्हात्रे यांना चैतन्याची अनुभूती झाल्याचे त्यांनी प्रतिपादन केले.त्याचप्रमाणे मतदार संघात प्रचार करताना अनेक ज्येष्ठ व्यक्तींनी असेही सांगितले की,आम्ही आयुष्यभर कार्यकर्ते राहिलो, पण नवतरुण कोणीतरी पुढे येत आहे याचा आम्हाला समाधान आहे आणि तुला आमचा आशीर्वाद आहे.

अक्षय म्हात्रे हे स्वतः पदवीधर इंजिनिअर असून त्यांनी कॉलेज तसेच हॉस्टेल चे आयुष्य अनुभवले असल्याने त्यांना पदवीधरांच्या समस्यांची जाण आहे. १९८८ साली कोकण पदवीधर मतदार संघ अस्तित्वात आला. पण तेव्हापासून कोण कोण पदवीधर आमदार झाले किंवा त्यांची काय कामे असतात..?.. त्या आमदारांनी पदवीधरांसाठी काय केले हे कोणालाही माहिती नाही.हे अक्षय म्हात्रे यांना पदवीधरांना प्रत्यक्ष भेटल्यावर समजले. आणि म्हणूनच पदवीधरांच्या न्याय हक्कासाठी आणि सन्मानासाठी तसेच पदवीधरांना स्वतःच्या हक्कांची जाणीव व्हावी आणि त्यांच्यामध्ये जागृती निर्माण व्हावी म्हणून अक्षय म्हात्रे यांनी ही निवडणूक लढविण्याचा निश्चय केला आहे.आज समाजात कितीतरी पदवीधर सुशिक्षित बेरोजगार आहेत किंवा एका फील्ड मध्ये शिक्षण घेऊन वेगळ्याच कोणत्यातरी फील्ड मध्ये जॉब करताना दिसतात.पण त्यांच्यासाठी आवाज उठवणारा कोणी हक्काचा माणूस नसल्यानेच रायगड, ठाणे, पालघर रत्नागिरी, सिंधुदुर्गसह संपूर्ण कोकणात मोठया प्रमाणात रोजगाराच्या संधी किंवा प्रकल्प असून सुद्धा स्थानिकांना कुठेतरी डावलण्यात येत आहे. कितीतरी सरकारी संस्था, शाळा, बँका, कार्यालयात जागा रिक्त आहेत किंवा होत आहेत तिथे तातडीने पदवीधरांना संधी दिली गेली पाहिजे.अनेक पदवीधर असे आहेत की त्यांचे वय निघून गेले असल्याने त्यांना कुठेही रोजगार मिळत नाही, त्यांच्यासाठी सरकारने ३-५ हजार किमान वेतन चालू केले पाहिजे. अनेक विद्यार्थी स्पर्धा परीक्षा पास होऊन सुद्धा त्यांना संधी मिळत नाही, त्यांना संधी ही मिळालीच पाहिजे. आणि म्हणूनच मी ही निवडणूक लढविण्याचा निर्धार केला आहे अशी माहिती अक्षय म्हात्रे यांनी दिली आहे.

फेसबुक, व्हॉट्स ॲप, सोशल मीडिया तसेच मीडियाच्या माध्यमातून माझा प्रचार अगदी योग्य दिशेने चालू असून मला माझ्या प्राथमिक, माध्यमिक, उच्चमाध्यमिक शाळा तसेच माझा डिप्लोमा कॉलेज, डिग्री कॉलेज, एमबीए कॉलेज तसेच मुंबई युनिव्हर्सिटी मधील माझे मित्र संपूर्ण कोकणात पसरले असून त्यांचा मला पूर्ण पाठिंबा आहे. तसेच माझे सर्व शिक्षकवृंद आणि विविध संघटनांनी मला पाठिंबा दर्शविला आहे. त्याच प्रमाणे हजारो लोकांचे, विविध पक्षांच्या कार्यकर्त्यांचे मला रोज कॉल येत असून दिवसागणिक मला असणारा वाढता पाठींबा लक्षात घेता मी नक्की निवडून येईन याची मला खात्री आहे.
तरी आपल्या पदवीधरांचा आवाज विधानपरिषदेत पोहोचविण्यासाठी आणि आपल्या न्यायहक्क, आणि सन्मानासाठी आपला प्रतिनिधी म्हणून मला निवडून देण्यासाठी माझ्या नावासमोर १ अंक टाकून म्हणजे मला पसंती क्रमांक १ देऊन मला भरघोस मतांनी विजयी करा.असे आवाहन अक्षय म्हात्रे यांनी पदवीधर मतदारांना केले आहे.

मित्रांनो आपले राजकीय पक्ष जे काही असतील, पण स्थानिक स्वराज्य संस्था जसे की, ग्रामपंचायत, जिल्हा परिषद, नगर परिषद किंवा मग विधानसभा, लोकसभा या निवडणुकीत तुम्ही पक्षाच्या बाजूने मतदान करा. पण ही आपली पदवीधरांची निवडणूक आहे, आईवडिलांनी खस्ता खाऊन आपल्याला पदवीधर केले, आपण अभ्यास आणि मेहनत करून एवढ्यावर पोहोचलो.त्यामुळे तुम्हाला तुमचा पदवीधर आमदार निवडण्यासाठी घटनेने दिलेला अधिकार असा वाया घालवू नका.आणि मला पसंती क्रमांक १ देऊन विजयी करा. माझा विजय हा तुमचा विजय असेल.तरीसुद्धा तुम्हाला पक्षालाच मतदान द्यायचे असेल, आणि पक्षाच्या उमेदवाराला पहिली पसंती द्यायची असेल तर, मला निदान पसंती क्रमांक २ तरी द्या.म्हणजे माझ्या नावासमोर २ तरी लिहा. पण तुमची पहिली पसंती स्वतःसाठी म्हणजे आपल्या हक्काचा प्रतिनिधी निवडण्यासाठी असेल आणि म्हणून तुम्ही माझ्या नावासमोर पसंती क्रमांक १ द्याल हा मला विश्वास तसेच पूर्ण खात्री आहे असे मत पदवीधर मतदार संघांचे अपक्ष उमेदवार अक्षय महेश म्हात्रे यांनी व्यक्त केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0