Pune Crime News : वाहन चोरी करणाऱ्या बंटी-बबली यांना केले जेरबंद
•सिंहगड पोलिसांचे मोठी कारवाई ; सराईत वाहन चोरी करणाऱ्या आरोपी पती पत्नीला पोलिसांनी ठोकल्या बेड्या, तब्बल 17 वाहने चोरी केल्याचे आरोपींनी केले कबुली
पुणे :- शहरांमधील वाहन चोरीच्या घटनेमधील बंटी बबलीचा जोडप्याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहे. तब्बल 17 वाहनांची चोरी करणाऱ्या सराई चोरी करणारे पती आणि पत्नी यांना सिंहगड पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी आरोपीकडून 08 चार चाकी आणि 09 मोटर सायकल असा एकूण 17 वाहन चोरीचा मुद्देमाल जप्त केला आहे. ज्याची किंमत बारा लाख 70 हजार असा आवाज सिंहगड रोड पोलिसांनी जप्त केला असून आरोपींकडून सतरा गुन्हे उघडकीस आणले आहे.
पुणे शहरातील वाहन चोरीच्या घटना वाढत असताना पोलिसांकडून वाहन चोरीचे गुन्हे उघडके सांगण्याकरिता पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी सूचना दिल्या होत्या. त्या अनुषंगाने पोलीस उपायुक्त परिमंडळ 3 पुणे शहर संभाजी कदम यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय कुंभार यांनी तपास पथक सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन निकम पोलीस उपनिरीक्षक संतोष भांडवलकर यांचे एक विशेष पथक नेमले होते. सिंहगड रोड पोलीस ठाण्याच्या हद्दीत झालेल्या वाहन चोरीच्या संदर्भात पोलीस अंमलदार उत्तम तारू,राहुल ओलेकर, शिवाजी क्षीरसागर यांना सात जून रोजी माहिती मिळाली होती की एक महिला आणि पुरुष लोणी काळभोर येथील वडील नाका या भागात रस्त्याच्या कडेला एका कार मध्ये बसले होते अशी माहिती मिळाली होती. पोलिसांनी सापळा रचून त्या संशयित आरोपींना अटक केली होती.
सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन निकम यांनी आरोपीची चौकशी केली असता आरोपीने पुणे आयुक्तालयाच्या हद्दीत 17 दुचाकी आणि चार चाकी चोरी केल्याची कबुली दिली त्यानंतर दोघेही आरोपी हे नवरा बायको असून ते शहरातील वेगवेगळ्या लॉजवर राहून दिवसभर लॉजवर थांबून रात्रीच्या वेळेस बाहेर पडायचे आणि वाहने चोरी करत असे कबुली दिली. पोलिसांनी या आरोपींचा अनेक दिवसापासून मागोवा घेऊन आरोपीला मोठ्या शिताफीने अटक केली आहे. तसेच आरोपीला लोणी काळभोर वडली नाला या भागातून ताब्यात घेतला असून त्यांनी आत्तापर्यंत 17 वाहने चोरी केल्याची कबुली दिली आहे. तसेच त्यांच्या विरोधात पुणे पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात सतरा गुन्ह्यांची नोंद आहे. तसेच सातारा आणि इतरत्र पोलीस ठाण्यात 14 गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे.
सराईत वाहन चोरी करणाऱ्या नवरा बायकोचे नाव
1.शाहरुख राजु पठाण (24 वर्ष)
2.पुजा जयदेव मदनाल ऊर्फ आयशा शाहरुख पठाण (21वर्ष)
दोन्ही आरोपीला न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने आरोपींना 18 जुन 2024 रोजी पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
पोलीस पथक
अमितेश कुमार पोलीस आयुक्त पुणे शहर, प्रविण पवार, पोलीस सह आयुक्त पुणे शहर, प्रविणकुमार पाटील, अप्पर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशिक विभाग पुणे शहर संभाजी कदम, पोलीस उप-आयुक्त परीमंडळ 3 पुणे शहर,जगदीश सातव, सहाय्यक पोलीस आयुक्त, सिंहगड रोड विभाग, पुणे शहर, विजय कुंभार, वरीष्ठ पोलीस निरीक्षक, सिंहगड रोड पोलीस स्टेशन पुणे शहर यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन निकम, पोलीस उप निरीक्षक, संतोष भांडवलकर, पोलीस अंमलदार, आबा उत्तेकर, संजय शिंदे, उत्तम तारु, राजु वेगरे, विकास बांदल, अमोल पाटील, विकास पांडोळे, देवा चव्हाण, शिवाजी क्षीरसागर, राहुल ओलेकर, सागर शेडगे, स्वप्नील मगर, विनायक मोहीते, शिरीष गावडे यांचे पथकाने केली.