Mumbai Police News : 13 अल्पवयीन बाल भिक्षेकऱ्यांची भिक मागण्यापासून मुक्तता
Mumbai Police Specials Child Safe Operation : विशेष बाल पोलीस कक्ष (SJPU), गुन्हे शाखा, मुंबई यांची मोठी कारवाई
मुंबई :- विशेष बाल पोलीस कक्ष (SJPU), गुन्हे शाखा, मुंबई या कक्षाकडून बांगूरनगर पोलीस ठाणे हद्दीत मिठ चौकी जंक्शन, मढ मार्च रोड, मालाड पश्चिम येथे मोठ्या प्रमाणावर अल्पवयीन मुले भिक मागत असल्याची माहिती मिळविण्यात आली होती. सदर माहितीची विशेष बाल पोलीस कक्ष (SJPU), कक्षाकडून शहानिशा करण्यात आली. सदर माहिती बाबत वरिष्ठांना अवगत करून त्याअनुषंगाने वरिष्ठांच्या मार्गदर्शनानुसार बाल भिक्षेकरी मुक्तता मोहिमेचे आयोजन करण्यात आले. Mumbai Police News
10 एप्रिल रोजी सकाळी 10.30 वाजताच्या दरम्यान वरिष्ठांचे मार्गदर्शनाखाली मिठ चौकी जंक्शन, मद-मार्वे रोड, मालाड पश्चिम येथे विशेष बाल पोलीस पथकाकडून बाल भिक्षेकरी मुक्तता कारवाईचे आयोजन करण्यात आले. सदर कारवाई मध्ये गुन्हे शाखेच्या अंमलबजावणी कक्ष, महिला अत्याचार प्रतिबंध कक्ष यांचे सहकार्य घेण्यात आले. त्यानुसार करण्यात आलेल्या कारवाईमध्ये एकुण 13 बाल भिक्षेकरी (03 ते 15 वयोगटातील) भिक्षा मागताना मिळून आले. व त्यांना भिक मागायला लावून त्यावर उदरनिर्वाह करणाऱ्या 04 प्रौढ महिला भिक्षेकरी मिळून आल्या. 13 अल्पवयीन बाल भिक्षेकरी यांना बाल कल्याण समिती, मानखुर्द, मुंबई यांचे समक्ष सादर करण्यात आले. बाल कल्याण समितीच्या आदेशाने सदर बालकांना बालगृहात जमा करण्यात आले. Mumbai Police News
कारवाईमध्ये अल्पवयीन मुलांना भिक्षा मागावयास लावून त्यावर उदरनिर्वाह करणाऱ्या 04 प्रौढ महिला भिक्षेकरी यांना ताब्यात घेवून बांगुरनगर पोलीस ठाण्यारा आणून बांगुरनगर पोलीस ठाणे कलम 24 बाल न्याय (काळजी व संरक्षण) अधिनियम 2000 सह कलम 5,9,11 भिक्षेकरी प्रतिबंधक कायदा 1959 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला व सदर गुन्हयात त्यांना अटक करण्यात आली. Mumbai Police News
पोलीस पथक
पोलीस आयुक्त बृहन्मुंबई विवेक फणसाळकर (Mumbai CP Vivek Phansalkar) ,विशेष पोलीस आयुक्त, बृहन्मुंबई देवेन भारती, पोलीस यह आयुक्त (गुन्हे) मुंबई, लखमी गौतम, अपर पोलीस आयुक्त, गुन्हे, मुंबई, शशि कुमार मीना, पोलीस उप-आयुक्त, अंमलबजावणी मुंबई, रागसुधा आर यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक, नितीन पोतदार, महिला पोलीस निरीक्षक, अनिता कदम, महिला सहाय्यक पोलीस निरीक्षक, संगिता पाटील, मपोशि भोसले, महिला पोलीस शिपाई तळेकर, बागल, बुधे, सोनकांबळे, विशेष बाल पोलीस युनिट – पोलीस उप निरीक्षक, नंदकुमार कदम, सहाय्यक फौजदार कदम, महिला सहाय्यक फौजदार मालवणकर, पोलीस हवालदार जेडगुळे, महिला पोलीस हवालदार रश्मी हळर्णकर, पोलीस हवालदार वाघमारे, महिला पोलीस शिपाई बेलोसे, दराडे, पोलीस हवालदार गोडसे, पोलीस शिपाई मोरे, घुगे, यादव, शिंदे यांनी यशस्वीरित्या केली.