धाराशिव

वृत्तपत्र विक्रेते व पत्रकारांसाठी स्वातंत्र महामंडळ निर्णयाचा कळंब तालुका व्हॉईस ऑफ मीडिया संघटनेचा जल्लोष

कळंब (प्रतिनिधी): राज्य शासनाने वृत्तपञ विक्रेते व पञकारांसाठी स्वतंञ्य विकास महामंडळास नुकतीच कॅबिनेट मंञीमंडळाच्या बैठकीत मंजुरी दिली या निर्णयाचा कळंब तालुका व्हाईस ऑफ मीडिया संघटनेच्यावतीने शुक्रवार दि.11 आक्टोंबर रोजी कळंब येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात फटाके फोडुन,पेढे वाटुन आनंदोत्सव साजरा करण्यात आला पञकारांच्या या मागणीसाठी व्हाईस ऑफ मीडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष संदीपजी काळे यांच्या नेतृत्वाखाली लढा उभारला होता.सलग तीन वर्ष शासन दरबारी पाठपुरावा करीत होते या मागणीला मोठे यश मिळाले आहे. वार्तांकन करताना पञकारांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते कशाचीही तमा न बाळगता सामाजीक बांधिलकीतुन बातम्या देण्याचे काम करीत आहेत.श या पञकारासाठी राज्य शासनाने गुरुवार ता.10 रोजी मंञालयात झालेल्या कॅबिनेट मंञीमंडळ बैठकीत मुख्यमंञी एकनाथ शिंदे,उपमुख्यमंञी देवेंद्र फडणवीस,उपमुख्यमंञी अजित पवार यांनी वृत्तपञ विक्रेते व पञकार यांच्यासाठी स्वतंञ्य विकास महामंडळाची स्थापना केली आहे. या निर्णयाचे स्वागत करुन कळंब व्हॉईस ऑफ मीडिया तालुका संघटनेच्या वतीने एम.डी.लाईव्ह देवि रोड कळंब येथे मुख्यमंञी व सर्व मंञीमंडळाचा अभिनंदनाचा ठराव घेऊन शहरातील छञपती शिवाजी महाराज चौकात फटाके फोडुन, एकमेकांना व चौकातील नागरिकांना पेढे वाटून आनंदोत्सव साजरा केला तसेच युवा सेनेचे राज्य समन्वयक नितीन दादा लांडगे यांनी छत्रपती शिवाजी महाराज चौकात येऊन सर्व पत्रकार बांधव यांना पेढा भरवुन शुभेच्छा दिल्या तसेच लक्ष्मण शिंदे यांनी पत्रकार बांधव यांना मार्गदर्शन केले यावेळी व्हाइस ऑफ मिडियाचे महाराष्ट्र राज्य कार्यवाहक अमर चोंदे, शिक्षण विभागाचे राज्य प्रमुख चेतन कात्रे,कळंब तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष अशोक भाऊ शिंदे, पत्रकार संघाचे विस्तव सतीश टोणगे, ज्ञानेश्वर पतंगे,तालुका कार्याध्यक्ष राम रतन कांबळे,उपाध्यक्ष रामराजे जगताप, साप्ताहिक विंगचे राजेंद्र भाऊ बारगुले,अकिक पटेल,,दिपक माळी,हनुमंत पाटुळे,महेश फाटक,सतीश तवले,लक्षमण शिंदे,जयनारायण दरक,समाधान जाधव,माधवसिंग राजपूत,अशोक कुलकर्णी आदिंची उपस्थिती होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0