Zoom App Car Robbery : झूम ॲपवरून कार भाड्याने घेऊन विक्री करणाऱ्या एका महाठगाला जेरबंद
Zoom App Car Robbery News : काशिगाव पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने सराईत कार चोरून विक्री करणाऱ्या एका आरोपीला अटक केली आहे
नालासोपारा :- वसई विरार नालासोपारा Vasai Virar Crime News या परिसरातील कार चोरीचे प्रमाण वाढताना दिसत आहे. अशातच आता कार चोरीचा नवा ट्रेंड समोर आला आहे. झूम ॲपवरून कार Zoom App Car Robbery भाड्याने घेणे आणि त्यानंतर तीच कार इतरत्र विक्री करणे असा सराईत गुन्हेगार असलेल्या एका कार चोर ठगाला काशिगाव पोलिसांच्या गुन्हे Kashigaon Police Station प्रकटीकरण पोलिसांनी अटक केली आहे. Vasai Virar Crime News
जॉन स्भसिंग कागडा, (वय 32, रा.आचोळे, नालासोपारा पुर्वे), ज्ञानेश्वर बाबुराव चव्हाण, (वय 32 व्यवसाय शेती, रा.जालना यांना) यांना कार खरेदी सेकंड हॅन्ड कार खरेदी करण्याकरिता त्यांनी मिरा रोड येथील इस्टेट एजंट असलेला मुस्तफा राशीद खान याच्याशी संपर्क साधला. त्यानंतर एजंट यांनी मोबाईलवरून वेगवेगळ्या गाडींचे फोटो पाठवले. तसेच त्यांना आर्टिका कंपनीचे गाडी आवडली. ती गाडी खरेदी करण्याकरिता त्यांना 3 सप्टेंबरला काशिमिरा नाका येथे बोलाविले त्यांच्याकडून दोन लाख रुपये घेऊन उर्वरित चार लाख रुपये गाडी दिल्यावर गाडी नावावर करून देतो असे सांगून तो तिथून निघून गेला. Vasai Virar Crime News
कार खरेदी करणाऱ्याचे पैसे घेऊन प्रसार!
तक्रारदार ज्ञानेश्वर चव्हाण यांच्या सोबत सहा लाख रुपयात केला व त्यांच्याकडून चार लाख रक्कम घेवून त्यांना गाडीचा ताबा घेण्या करीता 4 सप्टेंबर रोजी काशिमिरा नाका येथे बोलविले तक्रारदार बाकीचे पैसे घेवून काशिमिरा नाका येथे आले असता त्यांनी गाडी वॉश करुण व बँकेची प्रोसेस पूर्ण करुण येतो तुम्ही येथे थांबा असे बोलून त्या ठिकणाहून तो गाडी घेवून पळून गेला. तक्रारदार यांनी त्याला संपर्क केला असता त्याचा मोबाईल फोन बंद आला त्यावेळी त्यांची फसवणूक झाली असल्याचे त्यांच्या लक्षात आले त्यांच्या झालेल्या फसवणूकी वरुन काशिगाव पोलीस स्टेशन भा.न्या.सं कलम 318(4),316(2) प्रमाणे त्याच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला. Vasai Virar Crime News
भाड्याची गाडी ऑनलाईन बुक करून विक्री करणाऱ्या सराईत कार चोरी करणाऱ्याला पोलिसांनी ठोकल्या बेड्या
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी मुस्ताफा राशिद खान याने फसवणूकीसाठी गाडी ऑनलाईन झुम ॲपव्दारे भाड्याने घेवन तिची विक्री केली असल्याने त्याचा शोध घेवून त्याला अटक करण्याच्या सूचना वरिष्ठांनी दिल्या होत्या. मुस्ताफा राशिद खान (वय 32, रा. व्यापार कार ट्रेडींग, रा. नायगाव) याला ताब्यात घेवून त्याला गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे. अटक आरोपी या व्यतिरिक्त आणखीन किती लोकांची फसवणूक केली आहे याबाबतचा तपास वरिष्ठ पोलिस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली नमुद गुन्ह्याचे तपासी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक अभिजीत लांडे हे करत आहे. आरोपीच्या विरोधात चार पोलीस ठाण्यात यापूर्वीच कार चोरीचे गुन्हे दाखल आहे. Vasai Virar Crime News
पोलीस पथक
प्रकाश गायकवाड, पोलीस उप आयुक्त परिमंडळ 01, डॉ विजय मराठे, सहाय्यक पोलीस आयुक्त, मिरा रोड विभाग, राहुलकुमार पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, काशिगाय पोलीस स्टेशन यांच्या मार्गदर्शनाखाली काशिगाव पोलीस ठाण्याचे गुन्हे प्रकटीकरण शाखेचे अधिकारी अंमलदार यांनी केली आहे.