Zeeshan Siddiqui Latest News : दोन अनोळखी व्यक्तींना पोलिसांकडून ताब्यात; चौकशीत काहीही संशयास्पद निघालं नाही
मुंबई – माजी आमदार जीशान सिद्दीकी Zeeshan Siddiqui यांच्या कार्यालयाबाहेर संशयास्पदरीत्या थांबलेल्या दोन अनोळखी व्यक्तींना मुंबई पोलिसांनी Mumbai Police ताब्यात घेतलं आहे. दरम्यान, चौकशीदरम्यान या दोघांनी कोणताही संशयास्पद उद्देश नसल्याचं स्पष्ट झालं असून, त्यांचा उद्देश केवळ जीशान सिद्दीकी यांची भेट घेण्याचा होता, असं पोलिसांनी सांगितलं.
या दोघांबाबत प्राथमिक माहिती अशी की, ते ग्रामीण भागातून मुंबईत आले असून त्यांच्या कुटुंबाची आर्थिक स्थिती बिघडलेली आहे. त्यामुळे मदतीसाठी ते थेट जीशान सिद्दीकी यांच्याशी संपर्क साधू इच्छित होते. त्यासाठीच ते कार्यालयाबाहेर 3 ते 4 तास थांबले होते.
सदर घटना विशेषतः संवेदनशील ठरते कारण जीशान सिद्दीकी यांचे वडील आणि एनसीपीचे वरिष्ठ नेते बाबा सिद्दीकी यांची हत्या 12 ऑक्टोबर 2024 रोजी दसऱ्याच्या दिवशी याच कार्यालयाजवळ गोळ्या झाडून करण्यात आली होती. या भीषण हल्ल्याची जबाबदारी कुख्यात लॉरेंस बिश्नोई गँगने स्वीकारली होती. या घटनेनंतर जीशान सिद्दीकी यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली होती.
या पार्श्वभूमीवर, जीशान सिद्दीकी यांच्या हालचालींवर कुणी लक्ष ठेवत असल्याचा संशय उभा राहिला. मात्र, पोलिस तपासानंतर हे दोघं फक्त मदतीच्या आशेने आले होते, हे स्पष्ट झालं आहे.
दरम्यान, बाबा सिद्दीकी हत्याकांडात आतापर्यंत 26 आरोपींना अटक करण्यात आली असून, अनमोल बिश्नोई, मोहम्मद यासीन अख्तर आणि शुभम लोनकर हे आरोपी अद्याप फरार आहेत. या प्रकरणात मकोका अंतर्गत कारवाई सुरू आहे.
Mumbai Police Latest News : पोलीस दलाच्या आधुनिकीकरणावर राज्य सरकारचा भर | कौशल्य विकास मंत्री…
Maharashtra Political Latest News : वरळीच्या अधिवेशनात होणार मोठी घोषणा | पार्थ पवार यांना राज्यसभेची…
Eknath Shinde On VSR COMPANY : पक्षाचे मंत्री, नेते आणि आमदार आता 'व्हीएसआर'ने प्रवास करणार…
PM Modi Latest News : जागतिक राजकारणात नवा विक्रम | 10 कोटी फॉलोअर्स असणारे पहिले…
•मुंबईत एफआयआर नाकारल्यानंतर लढा आता बारामतीत | 'देवगिरी'वर स्मारकासाठी अर्थसंकल्पात तरतुदीचे संकेत | रोहित पवारांसोबत…
Yugendra Pawar On Ajit Pawar Accident : पवार कुटुंबातील दोन्ही पुतणे आता तपासासाठी मैदानात |…