Yerwada Crime | यम है हम.. येरवडा जेल समोरच राडा : येरवडा पोलिसांकडून एकास अटक
पुणे, दि. २७ ऑगस्ट, मुबारक जिनेरी (महाराष्ट्र मिरर) Yerwada Crime
कारागृहातून सुटणाऱ्या मित्राला घ्यायला आलेल्या तरुणाला यम है हम.. यम है हम… आज तुला दाखवतोच अशी धमकी देत गुंडगिरी करण्यात आली. येरवडा कारागृहाबाहेर झालेल्या राड्याने काही काळासाठी तणाव पसरला होता. येरवडा वपोनि रवींद्र शेळके Sr.Pi. Ravindra Shelke यांनी घटनेची तात्काळ दखल घेत एकास अटक केली. Yerwada Crime
याबाबत सविस्तर माहिती अशी कि, काल दि.26 ऑगस्ट रोजी दुपारी 3.30 वाजता चे सुमारास येरवडा जेल मेन गेट जवळ येरवडा पुणे येथे फिर्यादी ऋषिकेश सुनील घोरपडे व त्यांचे मित्र गोविंद रूपवते येरवडा जेलमधून सुटणार असल्याने त्याला घेण्याकरिता आले असताना सदर ठिकाणी ते जेलचे मेन गेट जवळ गेले असताना – यम उर्फ मयूर सरोदे, ज्ञानेश्वर लोंढे, शाहबाज यदु व त्याचे पाच ते सहा अनोळखी साथीदार आले . तेव्हा यम याने फिर्यादी यांना पाहून तुम्हाला आज दाखवतोच अशी धमकी देऊन फिर्यादी यांना त्यांचे कडील स्प्लेंडर दुचाकी वर जबरदस्तीने बसवून तुला आता सोडणार नाहीअशी धमकी देऊन मेंटल हॅास्पीटल कॅार्नर येथे नेहून हातापायाने मारहाण केली. Yerwada Crime
याप्रकरणी फिर्यादी ऋषिकेश सुनील घोरपडे, वय18 वर्षे, राहणार गणेश मंदिराजवळ, मोहन नगर, भोसरी, पुणे यांनी तक्रार दिल्यावरून येरवडा पोलीस स्टेशन गु. रजि. नं.व कलम:- 549/2024 कलम भा.न्याय. सं.कलम 138,351(1),115(2) 3(5) प्रमाणे आरोपी नाव 1) यम भाई उर्फ मयूर सरोदे राहणार गोडाऊनर चौक भोसरी पुणे, 2) ज्ञानेश्वर लोंढे राहणार राहणार गोडाऊनर चौक भोसरी पुणे, ३) यदु ४) शाहबाज राहणार मोहन नगर भोसरी पुणे व त्याचे 5 ते 6 अनोळखी साथीदार याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
वपोनि रवींद्र शेळके यांनी घटनेची गांभीर्याने दखल घेत आरोपी ज्ञानेश्वर लोंढे यास ताब्यात घेतले. फरार आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत.
Pune Police अधिक तपास विशाल टकले सहाय्यक पोलीस निरीक्षक येरवडा पोलीस स्टेशन करत आहेत.