•’जान महल’ युट्यूब चॅनेल चालवणारा जसबीर सिंह रूपनगरमधून अटक
ANI :- भारतामध्ये पाकिस्तानी गुप्तहेरगिरीशी संबंधित मोठा खुलासा समोर आला असून, पंजाब पोलिसांनी रूपनगर येथून जसबीर सिंह नावाच्या एका युट्यूबरला अटक केली आहे. जसबीर सिंह ‘जान महल’ नावाचा युट्यूब चॅनेल चालवत होता आणि त्याचे संबंध आधीच अटकेत असलेल्या ज्योती मल्होत्रा या युट्यूबरसह, पाकिस्तानच्या निष्कासित उच्चायोग अधिकारी एहसान-उर-रहीम उर्फ दानिश याच्याशीही असल्याचे उघड झाले आहे.
पंजाबचे पोलीस महासंचालक गौरव यादव यांनी यासंदर्भात माहिती दिली. मोहाली येथील स्टेट स्पेशल ऑपरेशन्स सेलने (SSOC) ही कारवाई केली असून जसबीरचा संबंध PIO शाकिर उर्फ जट्ट रंधावा या दहशतवादी समर्थक गुप्तहेर नेटवर्कशी असल्याचे निष्पन्न झाले आहे.
जसबीरने 2020, 2021 आणि 2024 मध्ये तीन वेळा पाकिस्तानमध्ये प्रवास केला होता. त्याने दिल्लीत झालेल्या पाकिस्तानच्या राष्ट्रीय दिनाच्या कार्यक्रमात सहभाग घेतला होता, जिथे त्याची भेट पाक लष्करातील अधिकाऱ्यांशी आणि इतर पाकिस्तानी व्ह्लॉगर्सशी झाली होती. पोलिसांनी त्याचे इलेक्ट्रॉनिक उपकरण जप्त केले असून, त्यात पाकिस्तानशी संबंधित अनेक संपर्क क्रमांक सापडले आहेत.
दरम्यान, ज्योती मल्होत्राच्या अटकेनंतर जसबीरने आपल्या संवादाचे आणि संबंधाचे पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याचाही पोलिसांना संशय आहे. या प्रकरणी मोहालीच्या एसएसओसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून संपूर्ण नेटवर्कचा शोध घेण्याचे काम सुरु आहे.
Mumbai Police Latest News : पोलीस दलाच्या आधुनिकीकरणावर राज्य सरकारचा भर | कौशल्य विकास मंत्री…
Maharashtra Political Latest News : वरळीच्या अधिवेशनात होणार मोठी घोषणा | पार्थ पवार यांना राज्यसभेची…
Eknath Shinde On VSR COMPANY : पक्षाचे मंत्री, नेते आणि आमदार आता 'व्हीएसआर'ने प्रवास करणार…
PM Modi Latest News : जागतिक राजकारणात नवा विक्रम | 10 कोटी फॉलोअर्स असणारे पहिले…
•मुंबईत एफआयआर नाकारल्यानंतर लढा आता बारामतीत | 'देवगिरी'वर स्मारकासाठी अर्थसंकल्पात तरतुदीचे संकेत | रोहित पवारांसोबत…
Yugendra Pawar On Ajit Pawar Accident : पवार कुटुंबातील दोन्ही पुतणे आता तपासासाठी मैदानात |…