मुंबई

Devendra Fadnavis : “तुम्हाला इकडे यायचा स्कोप आहे!” — फडणवीसांची ठाकरेंना विधानभवनातच ऑफर

Devendra Fadnavis On Uddhav Thackeray : सभागृहात ऑफर, बाहेर मिश्कील भेट, सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल

मुंबई : पावसाळी अधिवेशनात राजकीय फटाके फोडणाऱ्या अनेक घडामोडींमध्ये एक आगळा प्रसंग चर्चेचा विषय ठरला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस Devendra Fadnavis On Uddhav Thackeray यांनी विधान परिषदेत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना थेट ऑफर दिली — “तुम्हाला इकडे येण्याचा स्कोप आहे!” या शब्दांनी.

या वक्तव्याने सभागृहातील वातावरण काही क्षणांसाठी रंगतदार झालं, मात्र उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे चेहऱ्यावरचे बदलते भाव साऱ्यांच्या नजरेत भरले. पुढे काय घडणार, यावरून राजकीय भाकितंही सुरू झाली.

आदित्य ठाकरेंची मिश्कील टीप — “तुम्ही ऑफर दिलीत म्हणून स्वागताला आलो”

याच संदर्भात संध्याकाळी देवेंद्र फडणवीस आणि आमदार आदित्य ठाकरे यांची ओझरती भेट झाली. त्यावेळी आदित्य ठाकरे म्हणाले, “तुम्ही ऑफर दिलीत म्हणून स्वागताला उभा राहिलो आहे!” या वाक्यानंतर उपस्थितांमध्ये हास्यकल्लोळ उसळला. या प्रसंगाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.

दानवेंच्या निरोपाला रंग, पण ‘स्कोप’मुळे चर्चा रंगात

या साऱ्या घडामोडींचा पार्श्वभूमी म्हणजे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचा शेवटचा दिवस. त्यांच्या निरोप समारंभात बोलताना फडणवीसांनी ठाकरेंना ही ‘ऑफर’ दिली. ते म्हणाले, “आम्हाला विरोधी पक्षात जाण्याचा स्कोप 2029 पर्यंत नाही, पण तुम्हाला मात्र इकडे येण्याची शक्यता आहे.”

या वाक्याने राजकीय भाकितांना नवे खाद्य मिळाले असून, शिवसेना शिंदे गट, भाजप आणि ठाकरे गट यांच्यातील संभाव्य समीकरणांबाबत चर्चांना उधाण आलं आहे.

vivek

Recent Posts

Rohit Pawar : रोहित पवारांना ‘सीएकओ’चा फोन! विमान अपघाताच्या वादात स्मारकाची चर्चा; बारामती पोलीस ठाण्याबाहेर कार्यकर्त्यांची मोठी गर्दी

•मुंबईत एफआयआर नाकारल्यानंतर लढा आता बारामतीत | 'देवगिरी'वर स्मारकासाठी अर्थसंकल्पात तरतुदीचे संकेत | रोहित पवारांसोबत…

6 hours ago