मुंबई

Yogesh Kadam : मंत्री योगेश कदमांचं मंत्री नितेश राणेंना प्रत्युत्तर ; “माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवण्याची गरज नाही”

Yogesh Kadam on  Nitesh Rane : “माझ्या मतदारसंघात येऊन त्यांनी मला शहाणपणा शिकवण्याची गरज नाही, असं वक्तव्य गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी केलं.

मुंबई :- दापोलीमधील सभेत बोलताना नितेश राणे Nitesh Rane यांनी गृहराज्यमंत्री योगेश कदम Yogesh Kadam यांच्यावर टीका केली होती. त्यांच्या या टीकेला आज मंत्री योगेश कदम यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. मंत्री नितेश राणे माझे मित्र, पण माझ्या मतदारसंघात येऊन त्यांनी मला शहाणपणा शिकवण्याची गरज नाही असं वक्तव्य गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी केलं. मतदारसंघात शांतत कशी राखावी हे मला चांगलं समजतं असे चोख प्रत्युत्तर मंत्री योगेश कदम यांनी नितेश राणे यांना दिले.

नेमकं काय म्हणाले होते मंत्री नितेश राणे?

इथून पुढे तुमच्याकडे जर कोणी दगड फेकला तर त्या प्रत्येक दगडाचा हिशोब चुकता होईल हा विश्वास मी तुम्हाला देतो असे नितेश राणे दापोलीमध्ये म्हणाले होते. काही चिंता करु नका, आज राज्यामध्ये हिंदुत्वादी विचारांचे सरकार आहे. गृहखाते आमच्या देवेंद्र फडणवीस साहेबांकडे आहे. FIR मध्ये जर नाव आले नसेल, वाचवणारे कोणी असेल ते आपल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांपेक्षा मोठे नाहीत. संबंधीत खात्यातील काही लोकांनी लक्षात घ्यावं, अशी नाव न घेता मंत्री नितेश राणे यांनी गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्यावर टीका केली होती.

मी जन्मापासून शिवसेनेत आहे, बाळासाहेबांनी आम्हाला हिंदुत्वाचं बाळकडू पाजलंय. मी कधीही भगवा खाली ठेवला नाही, याचा अर्थ नितेश राणे यांनी समजून घ्यावं, असा टोला देखील योगेश कदम यांनी राणेंना लगावला. आमच्या हाहात आजही भगवा झेंडा आहे आणि उद्याही राहिल असे योगेश कदम म्हणाले. एका शिवसैनिकाला हिंदुत्व शिकवू नये असेही योगेश कदम म्हणाले. माझा मतदारसंघ शांत कसा ठेवायचा हे मला चांगल माहित आहे. त्यांनी कुठे सभा घ्यावी? काय घ्यावी? हा त्यांचा वैयक्तीक प्रश्न आहे. हिंदू धर्माचा प्रचार ते करत असतील तर मला आनंद आहे. पण माझ्यावर जर ते टीका करत असतील तर माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपण शिकवण्याची गरज नाही असा टोला योगेश कदम यांनी लगावला.

vivek

Recent Posts

Rohit Pawar : रोहित पवारांना ‘सीएकओ’चा फोन! विमान अपघाताच्या वादात स्मारकाची चर्चा; बारामती पोलीस ठाण्याबाहेर कार्यकर्त्यांची मोठी गर्दी

•मुंबईत एफआयआर नाकारल्यानंतर लढा आता बारामतीत | 'देवगिरी'वर स्मारकासाठी अर्थसंकल्पात तरतुदीचे संकेत | रोहित पवारांसोबत…

3 hours ago

मुंबई पालिकेचा ‘महा’बजेट: 80,952 कोटींचा विकास आराखडा! फेरीवाल्यांना आता ‘QR कोड’चे सुरक्षा कवच, तर अनधिकृत बांगलादेशींवर कठोर कारवाई

Mumbai Budget 2026 : कोस्टल रोड आणि पुलांच्या जाळ्यासाठी हजारो कोटींची तरतूद | मुंबईच्या विकासासाठी…

20 hours ago

मुंबईचा ‘महा’अर्थसंकल्प: 80,952 कोटींची विकासाची झेप! राखीव निधीतून 13 हजार कोटींचा अंतर्गत डोस, निवडणुकीनंतर पालिकेचा खजिना खुला

Mumbai Budget 2026 : प्रकल्पांची गती वाढवण्यासाठी राखीव निधीचा आधार | गेल्या वर्षीच्या तुलनेत 8.77…

20 hours ago