Yogesh Kadam : गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी दिली पनवेल शहर पोलीस ठाण्याला सरप्राईज व्हिजिट
पनवेल जितिन शेट्टी – महाराष्ट्र राज्याचे गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी सोमवारी रात्री अचानकपणे पनवेल शहर पोलीस ठाण्याला सरप्राईज व्हिजिट देवून येथे चालणाऱ्या कामाकाजाची माहिती घेतली. तसेच आवश्यक त्या सूचना केल्या.यावेळी गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी वपोनि. नितीन ठाकरे व इतर अधिकारी व कर्मचाऱ्यांशी संवाद साधून त्यांच्याकडून पोलीस ठाण्यांतर्गत चालर्णाया विविध कामाकाजाची गुन्हे, अटक आरोपी प्रमाण तसेच इतर विभागाची माहिती घेतली.
त्यानंतर त्यांनी मार्गदर्शन करताना आवश्यक त्या सूचना केल्या. त्यामध्ये नार्कोटिक्स बाबत जास्तीत जास्त कारवाई करून शाळा व कॉलेजेसमध्ये कॉन्सन्ट्रेट करणे. तसेच माल कुठून आणला त्याचे मुळापर्यंत जाणे, सायबर संबंधित गुन्हे ओपन करणे, महिला व बालकांविषयी असलेल्या गुन्ह्यांमध्ये विशेष लक्ष देणे. तसेच त्यांनी महिला लॉकअप बाबत विचारणा केली तसेच रात्रपाळीचे सर्व अंमलदार यांना त्यांच्या राहण्याबाबत विचारपूस करून महिलांचे प्रात्यविधीची व्यवस्था आहे अगर कसे याबाबत चौकशी केली. आतापर्यंत पनवेल शहर पोलीस ठाण्यामार्फत करण्यात आलेल्या कामाकाजाबद्दल त्यांनी समाधान व्यक्त करून आगामी काळात सुद्धा पनवेल शहर पोलीस स्टेशनकडून चांगली कामगिरी होईल, अशा प्रकारच्या शुभेच्छा त्यांनी दिल्या.