मुंबईठाणे
Trending

 YERE YERE PAISA 3 : ‘येरे येरे पैसा ३’ मल्टीप्लेक्समधून काढल्याने वादंग: मनसे आक्रमक तर सदावर्तेंनी डिवचले!

 YERE YERE PAISA 3 : मराठी चित्रपटाची गळचेपी? अमेय खोपकर यांचा मल्टीप्लेक्स मालकांना ‘काचा फोडण्याचा’ इशारा; सदावर्तेंकडून ‘कथेच्या ताकदी’वर बोट.

मुंबई: मराठी चित्रपटसृष्टी आणि मल्टीप्लेक्स मालकांमध्ये पुन्हा एकदा मराठी चित्रपटांना प्राधान्य देण्यावरून वाद निर्माण झाला आहे. ‘येरे येरे पैसा ३’  YERE YERE PAISA 3 हा मराठी चित्रपट हिंदी ‘सैय्यारा’ साठी मल्टीप्लेक्समधून एका आठवड्यातच संपूर्णपणे काढून टाकल्याचा दावा महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट सेनेचे अध्यक्ष आणि चित्रपटाचे निर्माते अमेय खोपकर यांनी केला आहे. या प्रकारामुळे संतप्त झालेल्या खोपकर यांनी मल्टीप्लेक्स मालकांना थेट ‘काचा फोडण्या’चा इशारा दिला आहे. मात्र, या वादात आता वकील गुणरत्न सदावर्ते यांनी उडी घेत खोपकरांना डिवचले आहे, “तुमच्या कथेत ताकद असेल तर प्रेक्षक स्वतः मागणी करतील,” असे ते म्हणाले आहेत.

संजय जाधव दिग्दर्शित ‘येरे येरे पैसा ३’ हा चित्रपट 18 जुलै रोजी प्रदर्शित झाला. त्याच दिवशी ‘सैय्यारा’ हा हिंदी चित्रपटही प्रदर्शित झाला. ‘येरे येरे पैसा’ आणि ‘येरे येरे पैसा २’ च्या यशानंतर तिसऱ्या भागाकडून प्रेक्षकांना मोठ्या अपेक्षा होत्या. मात्र, अवघ्या एका आठवड्यातच ‘सैय्यारा’ ला प्राधान्य देत ‘येरे येरे पैसा ३’ ला मल्टीप्लेक्समधून काढल्याने खोपकर यांनी पत्रकार परिषद घेऊन तीव्र नाराजी व्यक्त केली. “माझ्या चित्रपटासाठी मलाच आंदोलन करणे पटत नाही, पण जर मराठी चित्रपटांची गळचेपी केली गेली तर मी नक्कीच बदला घेणार, थेट काचाच फुटतील,” असा आक्रमक पवित्रा खोपकर यांनी घेतला.

यावर प्रतिक्रिया देताना गुणरत्न सदावर्ते म्हणाले, “येरे येरे पैसामध्ये इंटरेस्ट नाही, पब्लिकला इमोशनल लव्ह स्टोरी हवी आहे. तुमच्या कथेत ताकद असेल तर पब्लिक डिमांड करेल, नाहीतर कोण मागणी करेल?” त्यांनी पुढे असेही म्हटले की, “अमेय खोपकर यांच्या चित्रपटात ताकद नसेल आणि चित्रपटगृहात कोणी बसत नसेल, लोक तिकीट घेत नसतील तर मग त्याचा अर्थ काय?”

दरम्यान, या संपूर्ण प्रकारात मराठी मनोरंजनसृष्टीतील कोणीही आपल्या पाठीशी उभे राहिले नाही, याची खंतही अमेय खोपकर यांनी व्यक्त केली. “मी आजवर ज्यांच्यासाठी उभा राहिलो आणि अंगावर केसेस घेतल्या, त्या मनोरंजनसृष्टीतील एकही माणूस पुढे येऊन बोलत नाही, याचे प्रचंड वाईट वाटते,” असे खोपकर म्हणाले. त्यांनी सरकारकडेही मागणी केली की, “महाराष्ट्रातील चित्रपटगृहात मराठी चित्रपट लावण्याची मागणी सरकारकडे करावी लागते, यासारखी दुर्दैवी गोष्ट नाही. सरकारने मराठी चित्रपट आणि निर्मात्यांच्या मागे ठामपणे उभे राहिले पाहिजे.”

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0