Work From home नावाखाली फसवणूक,युट्युब व्हिडिओ लाईक, ऑनलाईन हॉटेल मूव्ही रेटिंग टास्क
•काशिगांव पोलिसांची कामगिरी फसवणुकीतील रक्कम परत मिळवून देण्यास यश, 5 लाख 16 हजार रुपयांची फसवणूक!
मिरा रोड :- Work From home च्या नावाखाली 5 लाख 16 हजारांची फसवणूक झाल्याची घटना काशीगावं पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली होती. youtube ऑनलाईन लाईक स्टास्क, ऑनलाईन हॉटेल मुव्ही रेटिंग यांना लाईक करण्याचे काम देण्यात आले होते. तसेच सायबर गुन्हेगारांनी हे टास्क पूर्ण केल्यास तसेच त्यामध्ये पैसे गुंतवल्यास अधिकचा नफा मिळेल असे आमिष दाखविले होते. काशिगांव पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या श्रीहरी पडाचागौडू रविंद्र यांनी 5 लाख 16 हजार 785 रुपयांची फसवणूक झाल्याची घटना पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे. पोलिसांनी अज्ञात आरोपींच्या विरोधात काशिमीरा पोलीस ठाण्यात भादवी कलम 420, 34 सह माहिती तंत्रज्ञान अधिनियमन कलम 66 (सी) 66 (डी) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,श्रीहरी पडाचागौडू रविंद्र यांनी काशिगांव पोलीस ठाण्यात ऑनलाईन फसवणुकीबाबत तक्रार दाखल केली होती. तक्रारीच्या अनुषंगाने पोलिसांनी काशिगाव पोलिसांच्या सायबर विभागाने तपास करत केलेल्या व्यवहारा संदर्भात वेगवेगळ्या बँक खात्यावर वळती केल्याचे दिसून आले. पोलीस यांनी त्वरित संबंधित बँकेसोबत पत्रव्यवहार करून सदर रक्कम गोठविण्यात आली होती. पोलिसांनी न्यायालयासोबत पत्रव्यवहार करून काशिगांव पोलिसांच्या सायबर विभागाने फसवणुकीतील 5 लाख 16 हजार 785 रुपये श्रीहरी पडाचागौडू रविंद्र यांच्या मूळ खात्यात परत मिळवून देण्यास यश आले आहे.
पोलीस पथक
प्रकाश गायकवाड, पोलीस उप आयुक्त, परिमंडळ-1, मिरारोड, विजयकुमार मराठे, सहाय्यक पोलीस आयुक्त, मिरारोड विभाग यांचे मार्गदर्शनाखाली राहुलकुमार पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, राहुल सोनवणे, पोलीस निरीक्षक, पोलीस हवालदार सचिन पाटील यांनी पार पाडली आहे.