क्रीडा

महिला विश्वचषक 2025: हरमनप्रीतच्या फौजेने इतिहास घडवला; डी. वाय. पाटीलवर दक्षिण आफ्रिकेचा धुव्वा!

Indian Women Cricket Team Win First ICC World : कपिल देव-धोनीच्या मांदियाळीत हरमनचा समावेश; BCCI कडून महिला संघासाठी 51 कोटींचे बक्षीस जाहीर

ANI :- हरमनप्रीत कौरच्या फौजेने अखेर महिनाभर चाललेली विश्वविजयाची मोहीम फत्ते करत भारतीय महिला क्रिकेट संघाने महिला विश्वचषक 2025 च्या जेतेपदावर आपले नाव कोरले आहे. नवी मुंबईतील नेरुळ येथील डी. वाय. पाटील अकादमी स्टेडियमवर 35,000 हून अधिक चाहत्यांच्या साक्षीने हरमनप्रीतने जेतेपदाचा करंडक उंचावला आणि देशभरातल्या क्रिकेटचाहत्यांच्या डोळ्याच्या कडा आनंदाश्रूंनी पाणावल्या.

या ऐतिहासिक विजयासह भारतीय महिला संघाने आपले पहिले-वहिला आयसीसी विश्वचषक जिंकण्याचा दुष्काळ संपवला आहे. या यशामुळे कपिल देव (1983), महेंद्रसिंग धोनी (2007, 2011) आणि रोहित शर्मा (2024) या दिग्गजांच्या मांदियाळीत आता कर्णधार हरमनप्रीत कौरच्या नावाचा समावेश झाला आहे.

बीसीसीआयची 51 कोटींची घोषणा

विश्वविजेत्या भारतीय महिला संघावर आता बक्षीसांचा वर्षाव होत आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) संघासाठी रोख 51 कोटी रुपये जाहीर केले आहेत. बीसीसीआयचे सचिव देवजीत सैकिया यांनी या बक्षीसाची घोषणा केली. ही रक्कम आयसीसीने या स्पर्धेच्या विजेत्या संघाला दिलेल्या बक्षीस रकमेपेक्षा मोठी आहे. आयसीसीने विजेत्या संघासाठी 4.48 मिलियन अमेरिकन डॉलर्स म्हणजेच जवळपास 39.55 कोटी रुपयांचं बक्षीस जाहीर केले होते.

सामन्यात भारताचा दणदणीत विजय

महिला विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करताना दक्षिण आफ्रिकेसमोर 298 धावांचा डोंगर उभा केला. भारताच्या डावात सलामीवीर शेफाली वर्माने 78 चेंडूत 7 चौकार व 2 षटकरांच्या मदतीने 87 धावांची झटपट खेळी साकारली. तर, दीप्ती वर्मानेही अर्धशतकी खेळी (58 धावा) करत संघाला मोठी धावसंख्या उभारून दिली.

भारताचं 299 धावांचं लक्ष्य घेऊन मैदानात उतरलेल्या दक्षिण आफ्रिकेच्या संघाला 246 धावांपर्यंतच मजल मारता आली आणि भारताने हा सामना 52 धावांनी खिशात घातला. दक्षिण आफ्रिकेकडून कर्णधार लॉरा वूल्व्हडार्टने शतकी खेळी (101 धावा) साकारली, पण तिला विजयापर्यंत नेता आले नाही. भारताकडून दीप्ती शर्माने (9.3 षटकात 39 धावा देत) 5 बळी टिपत भेदक मारा केला, तर शेफाली वर्मानेही 2 बळी घेत दीप्तीला चांगली साथ दिली. या विजयानंतर देशात महिला क्रिकेटला अधिक प्रोत्साहन मिळेल अशी अपेक्षा आहे.

vivek

Recent Posts

Rohit Pawar : रोहित पवारांना ‘सीएकओ’चा फोन! विमान अपघाताच्या वादात स्मारकाची चर्चा; बारामती पोलीस ठाण्याबाहेर कार्यकर्त्यांची मोठी गर्दी

•मुंबईत एफआयआर नाकारल्यानंतर लढा आता बारामतीत | 'देवगिरी'वर स्मारकासाठी अर्थसंकल्पात तरतुदीचे संकेत | रोहित पवारांसोबत…

4 hours ago